वाहतूक शाखेतर्फे राबविले रस्ता सुरक्षा अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:31 AM2021-01-21T04:31:53+5:302021-01-21T04:31:53+5:30
यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी उपस्थितांना प्रत्येकाने पाळावयाचे वाहतुकीचे नियम याबाबत माहिती देऊन वाहतुकीचे नियम पाळल्यास ...
यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी उपस्थितांना प्रत्येकाने पाळावयाचे वाहतुकीचे नियम याबाबत माहिती देऊन वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांचे प्रमाण कमी करणे शक्य असल्याने अनेकांचा जीव सुरक्षित राहू शकतो, असे सांगितले. दिवसेंदिवस वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबरच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे, दररोज हजारो वाहने रस्त्यावरून धावतात तेव्हा वाढत्या अपघातास आळा घालण्यासाठी प्रत्येकानेच वाहतूक नियम पालन करावे, असे मार्गदर्शनातून सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे, पोलीस नायक न्यायमूर्ती, तरारे, पोलीस काॅन्स्टेबल हुमणे, डोईफोडे यांच्यासह वाहतूक नियंत्रण शाखा, भंडाराचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. अभियानाला जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन लाभले. ३२ व्या राज्य रस्ता सुरक्षा अभिमानाच्या निमित्ताने वाहतूक निरीक्षक भंडारा शाखेतर्फे वाहनांना रिफ्लेक्टर लावणे तसेच नागरिकांना माहिती पत्रके वाटप करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे, पोलीस नायक न्यायमूर्ती, तरारे, पोलीस काॅन्स्टेबल हुमणे, डोईफोडे यांच्यासह अमलदार वाहतूक नियंत्रण शाखा, भंडाराचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
अभियानाला जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन लाभले.