सालई येथे रस्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:13 PM2017-08-25T23:13:46+5:302017-08-25T23:14:05+5:30

बावनथडीचे सिंचन प्रकल्पाचे कालवे अस्तव्यस्त असून, बावनथडीच्या अधिकाºयांनी सतत तीन वषार्पासून दिरंगाई केली.

Road stop agitation at Salai | सालई येथे रस्ता रोको आंदोलन

सालई येथे रस्ता रोको आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेचा पुढाकार : बावनथडीचे कालवे त्वरित दुरुस्त करा

लोकमत न्यूज नेटवर्क
जांब (लोहारा) : बावनथडीचे सिंचन प्रकल्पाचे कालवे अस्तव्यस्त असून, बावनथडीच्या अधिकाºयांनी सतत तीन वषार्पासून दिरंगाई केली. याचा उद्रेक म्हणून शेवटी शेतकºयांना शिवसेना जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात २४ आॅगस्टला रस्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.
मोहाडी आणि तुमसर तालुक्यात अनेक शेतकºयांची रोवणी अर्धवट आहेत. सिंचन प्रकल्पात पाणी असताना सुद्धा अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले. मगाील आठवड्यात दोन शेतकºयांनी शेतीला पाणी न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत.
परंतु अधिकाºयांना याची चिंता वाटत नाही. गोर गरीब, निराधार व्यक्तींना ६ - ६ महिने मानधन सुद्धा मिळालेले नाही. यावरून शासन किती संवेदनशील आहे हे लक्षात येते. करिता शेतकरी व सर्वसामन्य जनतेसाठी टोकाची भूमिका घेऊन सालई खुर्द मोहाडी येथे शिवसेनेने रास्तारोको आंदोलन केले. आॅनलाईन कर्जमुक्तीची डोकेदुखी ग्रामीण जनतेला खूप भेडसावत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अतिशय रोष व्यक्त करीत आहे.
या आंदोलनात शासनाच्या चुकीच्या धोरणाचा शेतकºयांनी निषेध केला. सालई परिसरातील शेतकरी यात सहभागी झाले होते. शेतकºयांच्या समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत आक्रमक आंदोलन करीत राहू, अशी प्रतिक्रीया राजेंद्र पटले यांनी दिली.
या रास्तारोको आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले यांनी केले.
यावेळी तालुका प्रमुख पवन चव्हाण, उपतालुका प्रमुख विनोद राहांगडाले, विधानसभा प्रमुख महेश पटले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित एच. मेश्राम, युवासेना उपजिल्हा प्रमुख मनोज चौबे, अंकुश पटले, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष मनोहर जांगळे, उमेश पटले, आसाराम दमाहे, कुंजीलाल पटले, नितीन लिल्हारे, नरेश टेंभरे, शंकर पटले, राजेश भगत, गोवर्धन पटले, सुखदास लिल्हारे, माजी सरपंच अमरकंठ सव्वालाखे, गुलाब पटले, बाळू पारधी, जयदेव चौधरी, भाऊराव गडरीया, गभने, भागचंद शरणागत, वसंता जिभकाटे, कृष्ण पटले, चेदुराम निमकर, जयराम नागपुरे, सौ. लीलाबाई लिल्हारे, सौ. ताराबाई भोयर, शिवराम गजभिये, राहुल लिल्हारे, योगेश परतेती, पृथ्वीराज खांडेकर, शिवलाल लिल्हारे, विनायक शरणागते, फदिश बले अनेक शिवसैनिक व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Road stop agitation at Salai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.