कोंढा येथे रस्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:44 AM2019-02-23T00:44:56+5:302019-02-23T00:48:16+5:30
येथील डॉ. अरुणा मोटघरे महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थापक यांनी ग्रा. पं. कोसरा येथील पदाधिकाऱ्यांना धमकी दिली. तसेच कर्मचारी भाऊराव पंचवटे यांच्यावर होत असलेला अन्याय आणि येथे विद्यार्थ्यांवर होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीच्या विरोधात शिवसेनेतर्फे गुरुवारला कॉलेजसमोरील राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा-कोसरा : येथील डॉ. अरुणा मोटघरे महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थापक यांनी ग्रा. पं. कोसरा येथील पदाधिकाऱ्यांना धमकी दिली. तसेच कर्मचारी भाऊराव पंचवटे यांच्यावर होत असलेला अन्याय आणि येथे विद्यार्थ्यांवर होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीच्या विरोधात शिवसेनेतर्फे गुरुवारला कॉलेजसमोरील राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या मदतीने आंदोलन थांबविण्यात आले.
डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय कोंढा-कोसरा हे राज्यमार्गावर आहे. तिथे वर्ग ११ ते वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थी घेत असतात. तसेच येथे अनेक प्रकारचे व्यावसायीक अभ्यासक्रम चालविले जाते. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट केली जात असल्याची तक्रार पवनी तालुका शिवसेनेकडे विद्यार्थ्यांनी केली. महाविद्यालयाच्या समोर वनविभागाच्या खुल्या जागेतून नेरला उपसा सिंचन योजनेची कोसरा वितरिकेचे बांधकाम जाणार आहे. ते बांधकाम प्राचार्य व संस्थापकाने धाक दाखवून अडविले. मागील आठवड्यात हे काम कंत्राटदार रामसिंग बैस यांनी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देखील वाद केला, तेव्हा कोसरा येथील ग्रा. पं. पदाधिकारी व गावकरी यांचेसोबत वाद केला. संस्थेचे कर्मचारी भाऊराव अन्यायाविरोधात पुन्हा आमरण उपोषण २० फेब्रुवारीपासून सुरु केले होते. संस्थापक व प्राचार्यांच्या विरोधात माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तालुका शिवसेना प्रमुख विजय काटेखाये, शिवाजी फंदी, प्रशांत भुते, सुधाकर साठवणे तसेच कोंढा येथील ग्रामपंचायत उपसरपंच जितेंद्र लिचडे, ग्रा. पं. सदस्य अमित जिभकाटे, ज्ञानदेव कुर्झेकर व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन डॉ. मोटघरे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे, अशी मागणी केली.