रेती वाहतूकदारांनी अडविला सहा तास रस्ता

By admin | Published: July 14, 2016 12:36 AM2016-07-14T00:36:43+5:302016-07-14T00:36:43+5:30

तामसवाडी रेती घाटावरून उपसा करण्यात आलेल्या रेतीची सितेपार गावातून वाहतूक केली जात आहे.

The road transporters blocked the road for six hours | रेती वाहतूकदारांनी अडविला सहा तास रस्ता

रेती वाहतूकदारांनी अडविला सहा तास रस्ता

Next

सीतापुरात वाहतूक ठप्प : ओव्हरलोडेड रेती वाहतुकीने रस्त्याची दूरवस्था
चुल्हाड (सिहोरा) : तामसवाडी रेती घाटावरून उपसा करण्यात आलेल्या रेतीची सितेपार गावातून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे पडले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी बुधवारला सकाळी ६ वाजता मुख्य रस्त्यावर लाकडांचे ओंडके टाकून रेतीचे ट्रॅक्टर व ट्रकांना ६ तास रोखून धरले. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.
सिहोरा परिसरात ३ रेती घाटांचे लिलाव झाले आहेत. यात वैनगंगा नदी काठावरील तामसवाडी रेती घाटांचा समावेश आहे. या घाटावरून उपसा करण्यात आलेली रेतीची वाहतूक सितेपार गावातून केली जात आहे. ओव्हरलोड रेतीची वाहतूक ट्रकमधून होत असल्याने प्रमुख रस्ता खड्डेमय झाला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. परंतु सितेपार - तामसवाडी - डोंगरला हा प्रमुख मार्ग दुरुस्त करण्यात आला नाही. रेतीघाटांचे कंत्राटदार रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे याचा फटका गावकऱ्यांना बसत आहे. सितेपारचे सरपंच गजानन लांजेवार यांनी २० वर्षापासून सातत्याने पत्रव्यवहार करीत आहे. परंतु रस्त्याची अवस्था वाईट असताना दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सितेपार गावातच बुधवारला सकाळी सहापासून ट्रॅक्टर व ट्रकची अडविण्यसााठी सुरुवात केली. प्रमुख मार्गावर लाकडांचे ओंडके टाकण्यात आले. यामुळे ट्रक व ट्रॅक्टरच्या लांबचलांब रांगा तयार झाल्या.
यावेळी गावातील प्रमुख चौकात जिल्हा परिषद सदस्य रेखा ठाकरे, सरपंच गजानन लांजेवार, देवचंद ठाकरे व मोहगावचे उपसरपंच उमेश कटरे यांचे नेतृत्वात गावकऱ्यांनी ठिय्या मांडला. खड्डेमय असणाऱ्या मार्गाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी गावकरी व पदाधिकारी अडले. तब्बल सहा तास रेतीचे वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रक गावकऱ्यांनी रोखून धरले. घटना स्थळावर नायब तहसीलदार निलेश गोंडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र शेंटे व कंत्राटदार उपस्थित झाले. कंत्राटदारांनी रस्ता डागडुजीची जबाबदारी स्वीकारल्याने वाहने सोडण्यात आली. यावेळी नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक बंद करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: The road transporters blocked the road for six hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.