३५.८१ कोटीतून साकारणार ६४.४८ कि.मी.चे रस्ते

By admin | Published: April 9, 2016 12:24 AM2016-04-09T00:24:36+5:302016-04-09T00:24:36+5:30

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या योजनेंतर्गत सन २०१५-१६ या वित्तीय वर्षात...

Roads of 64.48 km to be set up from 35.81 crores | ३५.८१ कोटीतून साकारणार ६४.४८ कि.मी.चे रस्ते

३५.८१ कोटीतून साकारणार ६४.४८ कि.मी.चे रस्ते

Next

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना : सातही तालुक्यांचा योजनेत समावेश
देवानंद नंदेश्वर भंडारा
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या योजनेंतर्गत सन २०१५-१६ या वित्तीय वर्षात भंडारा जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये ३५.८१ कोटी रुपये खर्चून ६४.४८ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने २०१५ मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित केली होती. या योजनेच्या माध्यमातून सन २०१५-१६ मध्ये राज्यभरात २ हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट होते.
या योजनेत २०१५-१६ मध्ये प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले. मात्र, योजनेला उशीरा सुरुवात झाली. राज्य शासनाकडूनही निधी उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला निधीची प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा सोमवारला ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे लाभदायक ठरली आहे. जिल्ह्यातील १० रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रधानमंत्री /मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या मुख्य अभियंत्यांनी रस्त्याच्या दर्जोन्नती करण्यासाठी ई-टेंडरिंग करुनच कार्यारंभाचे आदेश द्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. सदर रस्त्यांसाठी लागणारी जमीन कुठल्या विभागाच्या ताब्यात आहे, याची खात्री करावी करावी लागेल.

देखभाल दुरुस्तीसाठी २.४९ कोटी
सातही तालुक्यातील एकूण ६४.४८ किलोमिटरच्या लांबीच्या रस्त्याला ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असताना या कामाची ५ वर्षे नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी २.४९ कोटींची तरतूद केली आहे. ही तरतूद रस्तानिहाय तालुकास्तरावर करण्यात आली. लवकरच कामाला प्रारंभ होणार आहे.
बोरी, जांभोरा, एलकाझरीसाठी सर्वाधिक निधी
भंडारा, लाखनी, साकोली तालुक्यातील दोन रस्ते व अन्य चार तालुक्यातील प्रत्येकी एक रस्त्याच्या कामाच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. यात मोहाडी तालुक्यातील बोरी-जांभोरा-एलकाझरी-केसलवाडा या १०.४३ किलोमिटर रस्त्यासाठी ६.४५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर सर्वात कमी निधी लाखनी तालुक्यातील पिंपळगाव, खैरी, राजेगाव या १.४० किलोमीटर रस्त्यासाठी ७६.०१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

सातही तालुक्यातील रस्त्यांचा समावेश
भंडारा तालुक्यातील गुंथारा ते खुटसावरी या ६.५० कि़मी. रस्त्यासाठी ३२३.६७ लाख, दवडीपार ते गराडा (बु.) या ५.७० कि़मी.साठी ३२२.३५ लाख, लाखनी तालुक्यातील पिंपळगाव, खैरी, राजेगाव या १.४० कि़मी.रस्त्यासाठी ७६.०१ लाख, कनेरी ते केसलवाडा-रेंगोळा या ६ कि़मी. रस्त्यासाठी ३१७.४९ लाख, साकोली तालुक्यातील मोहघाटा- कुंभली या ५.८० कि़मी. रस्त्यासाठी ३१६.०१ लाख, चारगाव-परसोडी १.७० कि़मी.साठी ९२.९१ लाख, तुमसर तालुक्यातील डोगरला ते येरली, झारली पिपरा या १०.२५ कि़मी.साखळी रस्त्यासाठी ५०९.८४ लाख, मोहाडी तालुक्यातील बोरी, जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा या १०.४३ कि़मी. रस्त्यासाठी ६४५.३२ लाख, पवनी तालुक्यातील सिंगोरी-रोहना-सेलोरी या १०.२० कि़मी.साठी ६०७.१६ लाख आणि लाखांदूर तालुक्यातील परसोडी, भागडी, मांढळ या ६.५० कि़मी. रस्त्यासाठी ३७०.३७ लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत.

Web Title: Roads of 64.48 km to be set up from 35.81 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.