अड्याळ येथील रस्ते ठरताहेत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:37 AM2021-02-11T04:37:03+5:302021-02-11T04:37:03+5:30

फोटो १० लोक ०१ विशाल रणदिवे अडयाळ : गावातील असा एकही रस्ता नाही की त्यात खड्डे नाही. बऱ्याच रस्त्यावर, ...

Roads in Adyal are becoming dangerous | अड्याळ येथील रस्ते ठरताहेत धोकादायक

अड्याळ येथील रस्ते ठरताहेत धोकादायक

Next

फोटो १० लोक ०१

विशाल रणदिवे

अडयाळ : गावातील असा एकही रस्ता नाही की त्यात खड्डे नाही. बऱ्याच रस्त्यावर, रस्त्याचा मधोमध असल्याने ग्रामस्थांना त्याचा त्रास होत असला तरी त्याकडे येथील ग्रामपंचायत प्रशासन गप्प बसून आहे. एखादी मोठा अपघात होऊन त्यात एखाद्याचा जीव गेला तर याला जबाबदार कोण राहणार, असाही संतप्त सवाल यावेळी ग्रामस्थ करताना दिसतात.

गत आठ महिन्यात गावातील ग्रामस्थांनी हालअपेष्टा सहन केली. दुबार निवडणूक झाली, निकालही जाहीर झाला आणि कारभारही सांभाळायला सुरुवात कदाचित पुन्हा नव्या दमाने सुरुवात झाली. गावातील ठिकठिकाणी ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना तसेच वाहनचालकांना तसेच लहान सहान मुलांनासुध्दा त्याचा त्रास होतो. गावातील शौचालयांची अवस्थाही वाईट आहे. गावातील बसस्थानक परिसरात, तसेच गुजरी चौक ठिकाणच्या शौचालयात रोज शेकडोंच्या संख्येने ये-जा असते. पण त्या ठिकाणी स्वच्छता किती प्रमाणात असते, याचाही विचार ग्रामपंचायत प्रशासनाने करायला हवी, अशी अपेक्षा असते.पण ते नियमितपणे होत नाही. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी यावेळी केली जात आहे.

गाव पदाधिकारी यांना ही बाब दिसत नाही का? असाही संतप्त सवाल यावेळी ग्रामस्थ करतांना दिसतात. आता ग्रामस्थांनी सोडवायच्या येथील समस्या का? रस्त्यावरील खड्डे सिमेंट काँक्रीटने भरावीत, अशी मागणी अड्याळ ग्रामवासी करीत आहेत.

Web Title: Roads in Adyal are becoming dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.