दरोडेखोरांनी दीड किलो सोन्यासह २८ लाख पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:30 AM2020-12-24T04:30:39+5:302020-12-24T04:30:39+5:30
पोलिसांनी विविध भागातील सीसीटिव्ही फुटेज तपासले आहेत. त्यातून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान लॉकर तोडण्यासाठी वापरलेले गॅस ...
पोलिसांनी विविध भागातील सीसीटिव्ही फुटेज तपासले आहेत. त्यातून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान लॉकर तोडण्यासाठी वापरलेले गॅस सिलिंडर गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथून चोरल्याची माहिती पुढे आली आहे. त्या दृष्टीने आता पोलीस तपास केंद्रीत करण्यात आला आहे. नेमके किती दरोडेखोरे होते याचा अद्यापही अंदाज आला नाही. पोलिसांचे सहा पथक दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संजय खोकले तपास करीत आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह सायबर क्राईमचे पथकही दरोडेखोरांच्या मागावर आहेत. लवकरच दरोडेखोरे गजाआड होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
बॉक्स
ग्रामीण बँक शाखा दरोडेखोरांच्या निशान्यावर
ग्रामीण भागात असलेल्या बँकांच्या शाखा दरोडेखोरांच्या निशान्यावर असल्याचे सानगडी येथील दरोडा प्रकरणावरून पुढे येते. ग्रामीण भागात बँकेची स्वत:ची इमारत नसते. कुणाची तरी इमारत भाड्याने घेवून त्यात बँक स्थापन केली जाते. तेथे सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजनाही नसतात. इमारतीच्या खिडक्या आणि दरवाजेही तकलादू असतात. अनेक बँका रात्रपाळी सुरक्षा रक्षकही ठेवत नाही. अशा बँकात मात्र मोठ्या प्रमाणात रोख आणि सोने असते. हीच बाब दरोडेखोरांनी हेरले आहेत. दोन वर्षापुर्वी विर्शी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत याच पद्धतीने चोरी झाली होती. साकोली येथेही मोठा दरोडा पडला होता. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील बँका असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.