महाविद्यालयीन पुनर्परीक्षार्थ्यांची लूट

By admin | Published: July 13, 2016 01:41 AM2016-07-13T01:41:04+5:302016-07-13T01:41:04+5:30

विद्यापीठाच्या नवीन शुल्क निर्धारण निर्णयाप्रमाणे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षार्थी

Robbery of college reentry | महाविद्यालयीन पुनर्परीक्षार्थ्यांची लूट

महाविद्यालयीन पुनर्परीक्षार्थ्यांची लूट

Next

विद्यापीठ नियमांची पायमल्ली : एका विषयासाठी सर्वच विषयांचे परीक्षा शुल्क
भंडारा : विद्यापीठाच्या नवीन शुल्क निर्धारण निर्णयाप्रमाणे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षार्थी म्हणून ज्या विषयाची परीक्षा देण्यासाठी अर्ज करावयाचे आहे, त्याच विषयाचे निर्धारित शुल्क संबंधित महाविद्यालयाने त्या विद्यार्थ्याकडून घेणे आवश्यक आहे. परंतु महाविद्यालयीन प्रशासन विद्यापीठाच्या नियमांची पायमल्ली करीत आताही सरसकट परीक्षा शुल्क वसूल करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पदवी महाविद्यालयात पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची सर्रास आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येत आहे.
बी.काम. पदवीच्या अभ्यासक्रमातील एका विद्यार्थ्याने आपले नाव उघड न करण्याचा अटीवर सांगितले की, एका विषयात अनुत्तीर्ण असल्यास विद्यापीठाचा शुल्क ५० रूपये तसेच कॉलेजचा शुल्क मिळवून एकूण ९० रूपये शुल्क घेणे आवश्यक होते. परंतु त्या विद्यार्थ्यांकडून ४५० रूपये शुल्क सरसकट वसूल करण्यात आले.
हा प्रकार म्हणजे विद्यापीठातील नियमांचे सर्रास उल्लंघन करणारा आहे. सरसकट अधिकचे परीक्षा शुल्क वसूल करण्याचा प्रकार जवळपास सर्वच पदवी महाविद्यालयात घडत आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
शैक्षणिक सत्र २०१५-१६ दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथे ३१ डिसेंबर २०१५ रोजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क घेण्यासाठी विषयनिहाय व पेपर संख्येनुसार शुल्क निर्धारित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाची अधिसूचना १६ फेब्रुवारी २०१६ रोजी काढून सर्व पदवी महाविद्यालयांना पाठविण्यात आले. तसेच शुल्क निर्धारणसंबंधीची माहिती महाविद्यालयाच्या सूचना फलकावर लावण्याचे निर्देशही दिलेले आहेत. व्यवस्थापन समितीने निर्धारित केल्याप्रमाणे प्रतिपेपर मागे निम्न शुल्क आकारण्यात आले आहे.
त्यात ग्रंथालय विज्ञान प्रतिपेपर १३० रूपयेप्रमाणे, कला स्नातक (बीए) ७५ रूपये, वाणिज्य स्नातक (बी.कॉम.) ५० रूपये, विज्ञान स्नातक (बीएससी भाग-१) ७५ रूपये, बीएससी भाग २, ३ साठी १२५ रूपये, बीए अ‍ॅडीशनल १२५ रूपये, सीएसडब्ल्यू १५० रूपये, इतर अंतर्राष्ट्रीय भाषा पदवी अभ्यासक्रम ३२५ रूपये, बीएसडब्ल्यू भाग १ साठी १६० रूपये, बीएसडब्ल्यू भाग २ व ३ साठी १४० रूपये, बीएससी (गृह विज्ञान) ७५ रूपये, स्नातकोतर पदवी २००रू., एमएससी (गृह विज्ञान) २५० रूपये, गांधीयन विचार स्नातकोतर १६५ रूपये, एमएसडब्ल्यू २२५ रूपये, बीलिब १४० रूपये, एमलीब १६० रूपये, यानुसार एका पेपर मागे शुल्क घेण्याचे नियम आहेत.
तसेच सदर अधिसूचना प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या दर्शनी भागात सूचना फलकावर लावणे आवश्यक नाही, असेही माहीत झाले आहे. हा गैरप्रकार थांबविण्यात यावे, अशी मागणी पदवीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Robbery of college reentry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.