रस्त्यावरील हेल्मेट विके्रत्यांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 09:43 PM2018-12-03T21:43:22+5:302018-12-03T21:43:56+5:30

शहरात शनिवारपासून हेल्मेट सक्ती झाल्याने प्रत्येक दुचाकीचालक हेल्मेट विकत घेण्यासाठी धडपडत आहे. दुकानांपेक्षा रस्त्यावरील विक्रेत्यांकडे स्वस्तात हेल्मेट मिळत असल्याने ग्राहकांच्या उड्या पडत आहे. मात्र विना आयएसआय असलेले हेल्मेट ग्राहकांच्या माथी मारून त्याची पावतीही दिली जात नाही.

Robbery by street helmet vendors | रस्त्यावरील हेल्मेट विके्रत्यांकडून लूट

रस्त्यावरील हेल्मेट विके्रत्यांकडून लूट

Next
ठळक मुद्देहेल्मेट सक्ती : विना पावतीने सर्रास विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरात शनिवारपासून हेल्मेट सक्ती झाल्याने प्रत्येक दुचाकीचालक हेल्मेट विकत घेण्यासाठी धडपडत आहे. दुकानांपेक्षा रस्त्यावरील विक्रेत्यांकडे स्वस्तात हेल्मेट मिळत असल्याने ग्राहकांच्या उड्या पडत आहे. मात्र विना आयएसआय असलेले हेल्मेट ग्राहकांच्या माथी मारून त्याची पावतीही दिली जात नाही. ऐवढेच नाही तर एकाला एक भाव आणि दुसऱ्याला वेगळा भाव अशा पद्धतीने विक्री सुरू आहे.
भंडारा जिल्ह्यात १ डिसेंबरपासून दुचाकी चालकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाºयांवर ५०० रूपये दंड ठोकला जात आहे. यामुळे जनतेच्या मनात चांगलीच धास्ती बसली आहे.
अपघातापेक्षा पोलिसांचा दंड नको म्हणून प्रत्येक जण हेल्मेट खरेदी करीत आहे. या संधीचे सोने करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी शंभरावर हेल्मेट विक्रीचे दुकाने लागली आहे. याठिकाणी नागरिक हेल्मेट खरेदी करण्यासाठी गर्दी करून आहे. बाजारात अधिकृत दुकानांमध्ये हेल्मेटची किंमत ७०० रूपयांच्यावर आहे. मात्र याठिकाणी ३०० रूपयांपासून ते ६०० रूपयांपर्यंत हेल्मेट विकले जात आहे.
दुकानापेक्षा रस्त्यावर स्वत: मिळत असल्याने नागरिकांच्या उड्या पडत आहे. मात्र या ठिकाणी एका हेल्मेटच्या वेगवेगळ्या किंमती सांगून ग्राहक पाहून त्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. एवढेच नाही तर कोणतेही बिल दिले जात नाही. त्यामुळे जीएसटीसुद्धा बुडत आहे. हेल्मेट सक्तीच्या नावाखाली ग्राहकांची प्रशासनाच्या डोळ्यादेखत लूट होत असताना कुणीही बोलायला तयार नाही. एकीकडे पोलिसांचा दंड आणि दुसरीकडे हेल्मेट विक्रेत्यांकडून फसवणूक हा प्रकार गत तीन दिवसांपासून सुरु आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सामाजिक न्याय मंचचे निवेदन
शहरात करण्यात आलेल्या हेल्मेट सक्तीचे स्वागत अखिल भारतीय भ्रष्ट्राचार विरोधी सामाजिक न्यायमंचने केले आहे. परंतु सक्ती करण्यापुर्वी जनजागृती आवश्यक आहे.सध्या हेल्मेटच्या नावाखाली नागरिकांची पिळवणूक होत आहे. वेगवेगळ्या किंमतीत रस्त्यावर हेल्मेट विकले जात आहे. अशा दुकानदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना देण्यात आले. यावेळी न्यायमंचचे विदर्भ अध्यक्ष सुरज परदेशी, कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, कन्हैया नागपूरे, सचिन मेश्राम, मनोज मते, नितीन वासनिक, जालिंदर तांडेकर, उत्तम मेश्राम आदी उपस्थित होते.

Web Title: Robbery by street helmet vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.