रोहणीत ‘कोरोना’ विरूद्ध फुंकले रणशिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:51+5:30
केंद्र शासनाने जमावबंदी व संचारबंदी लागू करतांना अनेक कठोर निर्णय घेत देशातून कोरोना हद्दपार करण्याचे कसोशीचे प्रयत्न चालविले आहे. लोकसहभागातुन ही लढाई यशस्वी होण्याहेतू ग्रामस्तरापासून ते देशस्तरापर्यंत सरिव आवश्यक ऊपाययोजना देखील केल्या जात आहेत. गावखेड्यात जमावबंदी टाळण्याहेतू पानटपऱ्या, सार्वजनिक ठिकाणे व अन्य जिवनावश्यक वस्तुंची ठिकाणे देखील या मोहिमेत राबणाºया अधिकारी कर्मचाऱ्यांनी नजरबंद केली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना शहरी भागातून गावाकडे परतलेल्या संभाव्य संशयीतांकडून गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये, या हेतुने आरोग्य विभागाचे सहकार्य घेत ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रोहणी गावात कोरोना विरोधात रणशिंग फुंकले आहे.
केंद्र शासनाने जमावबंदी व संचारबंदी लागू करतांना अनेक कठोर निर्णय घेत देशातून कोरोना हद्दपार करण्याचे कसोशीचे प्रयत्न चालविले आहे. लोकसहभागातुन ही लढाई यशस्वी होण्याहेतू ग्रामस्तरापासून ते देशस्तरापर्यंत सरिव आवश्यक ऊपाययोजना देखील केल्या जात आहेत. गावखेड्यात जमावबंदी टाळण्याहेतू पानटपऱ्या, सार्वजनिक ठिकाणे व अन्य जिवनावश्यक वस्तुंची ठिकाणे देखील या मोहिमेत राबणाºया अधिकारी कर्मचाऱ्यांनी नजरबंद केली आहेत.
रोहणी गावात येथील सरपंच शेंडे, ग्रामसेवक संतोष बहिरेवार, अंगणवाडी सेविका चंदेल, अर्चना लोखंडे, पोलिस पाटील मेश्राम व आरोग्य कर्मचाºयांनी या गावात ग्रामसफाई, परिसर स्वच्छता व सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी घालतांना संपूर्ण गावात सोडियम हायपोक्लोराईड या द्रावणाची फवारणी देखील केली आहे.
दरम्यान, या गावात शहरी भागातून आलेल्या काही लोकांच्या घरी जाऊन भेट देत होम क्वारेंटॉईनचे तंतोतंत पालन करण्याचे सांगीतले तर गावकºयांना देखील कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी शासन निदेर्शानुसार प्रतीबंधात्मक उपाययोजने सबंधाने जनजागृती केली असून सार्वजनिक स्थळी गावकºयांनी गर्दी करणे टाळून अनावश्यक संचार टाळावा असेही आवाहन केले.
या ग्रामपंचायतच्या स्तुत्य अंमलबजावणीची माहिती लाखांदूर पंचायत समितीचे बिडीओ जी. बी. करंजेकर यांना होताच त्यांनी तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी मेश्राम व अन्य चमुसह रोहणी गावाला भेट देवून कोरोना विषाणू विरोधात सामुहिक लढाईसाठी सर्वांनी शासन निदेर्शाचे पालन करावे असे सांगीतले.