रोहयो कामावर सुविधांचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:08 PM2018-05-13T22:08:27+5:302018-05-13T22:08:27+5:30

ROHYO Workplace deletion | रोहयो कामावर सुविधांचा बोजवारा

रोहयो कामावर सुविधांचा बोजवारा

Next
ठळक मुद्देझंजाळ : माजी मालगुजारी तलावांचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासन प्रशासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जी कामे सुरु आहेत. त्या कामावरील मजुरांना सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागाने निधिची तात्काळ तरतुद करावी अशी मागणी सितेपार ग्रामपंचायतच्या सरपंचा मंजूषा मार्कंड झंजाळ यांनी केली आहे.
शासन प्रशसनाच्यावतीने मजूरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबतचे लोकमान्य धोरण असुन या मार्फत ग्राम विकासाची कामे केली जातत. सध्या तलावाचे खोलीकरण, भातखचरे, पांदन रस्ते अशा प्रकारचे विविध कामे ग्रामपचांयतच्या मार्फत केली जातात. परंतू या कामावरील मजुरांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष निधीची तरतुद करण्यात आली नसल्यामुळे या कामावरील मजुरांना शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या सितेपार येथे मामातलाव खोलीकरणाचे काम सुरु असून मजूरांना उन्हाच्या तडाख्यात माती खोदण्याचे काम करावे लागते. त्यामुळे काही मजुरांना उष्माघाताला बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पिण्याचे पाणी व आरोग्य विषयक बाबींची व्यवस्था करणे गरजेचे असले तरी सदर व्यवस्थेसाठी संबंधित विभागाकडून विशेष निधी प्राप्त झाला नसल्यामुळे रोहयोच्या कामावर व्यवस्था करण्यासाठी तारांबळ उडत आहे.
त्यामुळे सितेपार (झं.) येथील रोहयोच्या कामावरील मजूरांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी संबंधित विभागाने मजुरांना विश्रांतीसाठी नेट शेड, पिण्याचे पाणी, त्यांच्या मजुरांची प्रकृती बिघडल्यास फिरते आरोग्य मोबाईल व पथक, ओआरएस ग्लुकोज पावडर तसेच प्राथमिक उपचाराच्या साधनाची व्यवस्था करण्यासाठी संबंधीत विभागाने तात्काळ निधीची तरतुदकरुन निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी सरपंचा मंजूषा झंजाळ यांनी केली आहे.

Web Title: ROHYO Workplace deletion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.