रोहयोची कामे जिल्ह्यात ठरू शकतात कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:35 AM2021-04-18T04:35:13+5:302021-04-18T04:35:13+5:30

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होईपर्यंत तरी जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयो कामांना स्थगिती द्यावी, अशी मागणी भंडारा तालुक्यातील एका रोजगार सेवकाच्या ...

Rohyo's work could be a hotspot for corona infection in the district | रोहयोची कामे जिल्ह्यात ठरू शकतात कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट

रोहयोची कामे जिल्ह्यात ठरू शकतात कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट

Next

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होईपर्यंत तरी जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयो कामांना स्थगिती द्यावी, अशी मागणी भंडारा तालुक्यातील एका रोजगार सेवकाच्या व भंडारा पंचायत समितीतील रोहयो विभागाच्या व कृषी विभागातील एका क्लार्कलाही कोरोनामुळे आपला कर्तव्यावर असताना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने किमान आता तरी रोहयो कामे थांबवावीत, अशी मागणी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी करू लागले आहेत.

गोंदिया जिल्ह्यात एका रोजगार सेवकामुळे ३२ जण पॉझिटिव्ह झाले होते. त्यानंतर भंडारा तालुक्यातील एका रोजगार सेवकाला, एका पंचायत समितीतील रोहयो विभागाच्या व कृषी विभागातील एका क्लार्कलाही कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याने कर्मचारीवर्गातूनही संताप व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी काही दिवस रोहयो कामांना स्थगिती देण्याची मागणी आता गावागावांतून होऊ लागली आहे.

बॉक्स

रोहयो कामांसाठी कर्मचाऱ्यांचा

अनेक विभागांशी येतो संपर्क

शासकीय कर्मचाऱ्यांना दररोज रोहयो कामाचे मस्टर काढावे लागत असल्याने शासकीय, अधिकारी कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी विभाग, वन विभाग व विविध ग्रामपंचायती, तसेच सरपंच, रोजगारसेवकांशी संपर्क येत असल्याने रोहयोची कामे सुरू केल्यास रोहयो कामे कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र ठरू शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आताच तीस हजारांच्या घरात गेला आहे. रोहयो कामाने हा आकडा आणखी वाढू शकतो. त्यामुळे कोरोना संसर्गाचा आकडा रोखायचा असेल, तर किमान आणखी काही दिवस तरी रोहयो कामांना स्थगिती देण्याची गरज आहे.

बॉक्स

रोहयो अधिकारी, रोजगार सेवकाच्या

मृत्यूने कर्मचारी संतप्त

शासनाने अद्यापही कृषी अधिकारी, कर्मचारी, तसेच काही शासकीय कर्मचाऱ्यांसह रोजगार सेवकांना कोरोना संकटात विमा सुरक्षेचे कवच दिलेले नाही. त्यामुळे रोहयोची कामे करताना जिल्ह्यात कोणाचा मृत्यू झाल्यास शासन त्याची जबाबदारी घेणार काय, असा प्रश्नही ग्रामसेवक, कृषी सहायक, पंचायत समिती रोहयो विभागातील कार्यरत अधिकारी, कर्मचारी, वनरक्षक, रोजगार सेवक करू लागले आहेत. रोहयो कामे करताना अनेकांचा संपर्क येत असल्याने अशा स्थितीत कोरोना संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Rohyo's work could be a hotspot for corona infection in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.