पत्रकारांची भूमिका आरशाप्रमाणे असावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:31 PM2017-12-31T23:31:03+5:302017-12-31T23:31:22+5:30

आरशात दिसणारी प्रतिमा ही वास्तविक असते. बनावट व खोट्या प्रतिमा आरशासमोर टिकत नाहीत.

The role of journalists should be as a mirror | पत्रकारांची भूमिका आरशाप्रमाणे असावी

पत्रकारांची भूमिका आरशाप्रमाणे असावी

Next
ठळक मुद्देचरण वाघमारे यांचे प्रतिपादन : मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघ तर्फे पत्रकारांचा सत्कार

आॅनलाईन लोकमत
वरठी: आरशात दिसणारी प्रतिमा ही वास्तविक असते. बनावट व खोट्या प्रतिमा आरशासमोर टिकत नाहीत. पत्रकारात समाज परिवर्तनाची क्षमता आहे. समाजातील मोठा घटक हा पत्रकारांनी मांडलेल्या विचाराच्या प्रवाहावर विश्वास ठेवतो. अनेक क्षेत्रात झालेल्या क्रांतीचा इतिहास हा पत्रकाराच्या लेखनावरून घडल्याचे अनेक उदाहरण आहेत. त्यामुळे पत्रकारांनी चांगल्या कामाची स्तुती व वाईट कृत्यावर प्रहार करण्याचे कर्तव्य पार पाडावे. पारदर्शी व नि:ष्पक्ष लेखन करून व्यक्तिपूजा न बाळगता आरशाप्रमाणे स्पष्ट भूमिका मांडावी, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.
मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार स्नेहसंमेलन व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वकांत भुजाडे, महासचिव चंद्रशेखर साठवणे, उपाध्यक्ष युवराज गोमासे व कोषाध्यक्ष संजय मते उपस्थित होते. यावेळी संघाचे अध्यक्ष विश्वकांत भुजाडे यांनी पत्रकारांना विधानसभा क्षेत्रात असणाºया विविध शासकीय समित्यांवर सदस्य म्हणून संधी देऊन ग्रामीण भागातील पत्रकारांकरीता कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी आमदार म्हणून शासनाकडे मागणी करण्याची मागणी केली. प्रत्येक तालुकास्तरावर पत्रकारांसाठी पत्रकार भवन व ज्येष्ठ पत्रकारांसाठी निशुल्क आरोग्य सेवा व पेन्शन देण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची मागणी आपल्या भाषणातून केली.
यावेळी पत्रकार म्हणून वावरताना राजकीय क्षेत्रात भरारी घेणाºया नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला. यात वरठीचे उपसरपंच सुमित पाटील, सरपंच भूपेंद्र पवनकर, ग्रामपंचायत सदस्य सुधीर गोमासे व भोजराम तिजारे यांचा समावेश होता.
प्रास्ताविक विलास बन्सोड, संचालन चंद्रशेखर साठवणे व आभार अनिल वैद्य यांनी मानले.

Web Title: The role of journalists should be as a mirror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.