राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची - नगराध्यक्ष प्रदीप पडोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:39 AM2021-09-06T04:39:35+5:302021-09-06T04:39:35+5:30
तुमसर येथील जनता विद्यालयात लायन्स क्लबतर्फे आयोजित शिक्षकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तुमसर लायन्स क्लबचे अध्यक्ष मनोज ...
तुमसर येथील जनता विद्यालयात लायन्स क्लबतर्फे आयोजित शिक्षकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तुमसर लायन्स क्लबचे अध्यक्ष मनोज हुकरे होते; तर प्रमुख अतिथी म्हणून बॅकवर्ड क्लासेस शैक्षणिक व सामाजिक सुधारणा मंडळाचे सचिव कुंदन बोरकर, संस्थेचे विश्वस्त डॉ. कृपाचार्य बोरकर, मुख्याध्यापक राजकुमार गभने, लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य ललितकुमार थानथराटे, आशिष कुबडे, परवेज राजाभोज, लीला पारधी, उपमुख्याध्यापक राजकुमार राठी, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक ओमप्रकाश गायधने, स्वप्निल बोरकर, कांचन पडोळे, विज्ञान शिक्षक पंकज बोरकर, शंकर दादा बडवाईक, आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व इतर अतिथींच्या हस्ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचा सत्कार करण्यात आला. यात जी. जे. चव्हाण, राजाभोज, विठ्ठलराव रहमतकर, प्रा. राजेंद्र डांगे, राहुल डोंगरे, मुख्याध्यापक ओ. बी. गायधने, प्रा. मोहन भोयर, प्रा. विद्यानंद भगत, शिक्षक वृंद सुधीर हिंगे, माया बोरकर, सोमा कापगते, दीपक हरणे, जाधव, के. के. भगत, युवराज बोपचे, प्रा. एन. टी. कापगते, राखी बिसेन, लीना मते, आरामे, बावनकर, संगीता खोबरागडे, मंदा गाढवे, शिंदे, प्रमोद संग्रामे, व्ही. बी. लंजे, परशुरामकर, मनीष साठवणे, पारधी, पटले, चाचिरे, पंचभाई प्रा. सविता डोंगरवार, प्रा. आशिष खोब्रागडे, प्रा. नितीन पाटील, प्रा. गणेश चाचीरे, आदी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
संचालन लायन्स क्लबच्या आदिती काळबांडे व आभार कुंदा वैद्य यांनी मानले.