ध्येयसिद्धीसाठी महिलांची भूमिका निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 10:20 PM2018-10-06T22:20:37+5:302018-10-06T22:20:55+5:30

जगामध्ये महिलाकेंद्रित भूमिका ठेऊन विकासाच्या योजना आखल्या न गेल्यामुळे अनेक देशासह आपल्या देशात गरिबी, विषमता, आरोग्याच्या असुविधा व अन्नधान्य विकत घेण्याची क्षमता विकसित न केल्यामुळे पोषणाची गरज वाढत चालली आहेत. पर्यावरणाच्या बदलामुळे त्याची झळ याच घटकावर होते. भविष्यात शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची राहील, असे प्रतिपादन राजीव गांधी बॉयोटेक्नॉलॉजी सेंटरच्या विभागप्रमुख डॉ. आरती शनवारे यांनी केले.

Role of women for their achievement | ध्येयसिद्धीसाठी महिलांची भूमिका निर्णायक

ध्येयसिद्धीसाठी महिलांची भूमिका निर्णायक

Next
ठळक मुद्देआरती शनवारे : आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत ‘महिलांचा सहभाग’ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जगामध्ये महिलाकेंद्रित भूमिका ठेऊन विकासाच्या योजना आखल्या न गेल्यामुळे अनेक देशासह आपल्या देशात गरिबी, विषमता, आरोग्याच्या असुविधा व अन्नधान्य विकत घेण्याची क्षमता विकसित न केल्यामुळे पोषणाची गरज वाढत चालली आहेत. पर्यावरणाच्या बदलामुळे त्याची झळ याच घटकावर होते. भविष्यात शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची राहील, असे प्रतिपादन राजीव गांधी बॉयोटेक्नॉलॉजी सेंटरच्या विभागप्रमुख डॉ. आरती शनवारे यांनी केले.
ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडाराच्या आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत व विदर्भ वन विकास संघटना अखिल भारतीय जन वन आंदोलन, ‘ग्लोबल फॉरेस्ट कॉयलेशन व सेंटर फॉर पीपल्स कलेक्टीव्ह’ नागपूरद्वारा शेती आणि वन संवर्धन विकास महिलांचा सहभाग या विषयावर ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, प्रशिक्षण सभागृह भंडारा येथे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यशाळेचे अध्यक्ष कॉलेज आॅफ सोशल वर्क कामठीचे प्राचार्य डॉ. रमेश शामकुंवर, प्रमुख पाहुणे डॉ. तृप्ती कल्याशेटी, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा अध्यक्ष अ‍ॅड. संजीव गजभिये सचिव अविल बोरकर, प्रेम शामकुवर नागपूर आदी मान्यवर उपस्थितीत होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. शनवारे पुढे म्हणाल्या नैसर्गिक संसाधनमध्ये महिलांचे हक्क् व व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या घेतल्या तर विकास आराखडे व अंमलबजावणीच्या कार्यप्रक्रियेत मोठा बदल घडून येऊ शकतो. महिलांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासोबत जैविक तंत्रज्ञानाची जोड दिली तर सहज विकासाचे उद्दिष्टये गाठण्यास वेळ लागणार नाही. ग्रामीण अर्थ व्यवस्था जल, जंगल, जमीन, जनावर, या मुल घटकांच्या सहयोगानेच मजबूत होऊ शकतील.
डॉ. कल्याणशेटी म्हणाल्या की, महिलांचे आरोग्याचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. त्यात अ‍ॅनिमियाचे प्रमाण वाढणे ही मोठी धोक्याची चिन्ह आहेत ते ग्रामीण संसाधनाचा योग्य वापर केल्यास या परिस्थितीवर मात करता येऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.
डॉ. रमेश शामकुवर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, महिलांनी विकासाच्या प्रक्रियेत महत्वाचे योगदान दिल्याची प्रेरणा घेऊन कार्य करण्याची गरज दर्शविली. अ‍ॅड. गजभिये म्हणाले की, जैव व विधतेच्या संरक्षणाचे नेतृत्व महिलांनी घ्यावे, अशी मांडणी केली तसेच निशांत माटे यांनी जागतिक शाश्वत विकासाचे १७ ध्येय विश्लेषणाची मांडणी केली. अविल बोरकर यांनी सहभागी महिलांच्या गट चर्चा घेऊन आपल्या परिसरातील नैसर्गिक संसाधना आधारित आर्थिक विकासाचे नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण मोते यांनी कार्यक्रमाला भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील ९० महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आभार प्र्रदर्शन गौतम नितनवरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. सविता चवंडे कामठी, चेतना बोरकर, सचिन बोंद्रे, सागर बागडे यांचे योगदान राहिले.

Web Title: Role of women for their achievement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.