राजकारणात युवकांची भूमिका महत्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2016 12:20 AM2016-07-10T00:20:36+5:302016-07-10T00:20:36+5:30

राजकारणाबाबद वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत झाले आहे. त्यामुळेच राजकारण नको रे बाबा म्हणत युवकवर्ग पळवाटा काढताना दिसत आहे.

The role of youth in politics is important | राजकारणात युवकांची भूमिका महत्वाची

राजकारणात युवकांची भूमिका महत्वाची

Next

हेमंत मलेवार यांचे प्रतिपादन : एनएसयुआयची कार्यकारणी व पक्ष प्रवेश समारंभ
तुमसर : राजकारणाबाबद वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत झाले आहे. त्यामुळेच राजकारण नको रे बाबा म्हणत युवकवर्ग पळवाटा काढताना दिसत आहे. परंतू राजकारणाची परिभाषा काही औरच असून ती समाजकार्याचे व्रत आहे. चांगला समाज घडविण्यासाठी युवकांनी राजकारणात सहभाग नोंदवून महत्वाची भूमिका नोंदवावी, असे प्रतिपादन एनएसयुआयचे तालुका अध्यक्ष हेमंत मलेवार यांनी केले. एनएसयुआयची नवीन कार्यकारणी तसेच युवकांचा पक्ष प्रवेश समारंभाच्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचकावर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद तितिरमारे, अरविंद कारेमोरे, मनोहर सिंगनजुडे, सिमा भुरे, शंकर राऊत, भूषण टेंभूर्णे, बाळा ठाकूर, जयप्रकाश भवसागर, कान्हा बावनकर, दिलीप चोपकर, शिवदास मलेवार, सद्दाम शेख, अस्मिता वाघमारे, विवेक गायधने, पवन वंजारी, सुनिल बन्सोड उपस्थित होते. मलेवार म्हणाले, भाजप पक्षात बेरोजगार युवकांना सुवर्ण स्वप्ने दाखवून, भुलथापा देत केंद्रात व राज्यात सत्ता स्थापित केली. मात्र अवघ्या दोन वर्षातच त्यांचे पितळ उघडे पडले आहे. भाजपचे दाखवायचे दात वेगळे व खायायचे दात वेगळेच असल्याचे चित्र जनतेसमोर आले आहे. ते चित्र गावागावातील तळागाळातल्या युवकापर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पोहचविण्याचे सामर्थ केवळ युवकातच आहे. युवकांनीही सदविवेक बुद्धीचा वापर करून पक्षाची निवड करण्याच्याही सल्ला दिला. दरम्यान या प्रसंगी ५० च्या वर युवक-विद्यार्थ्यांनी एनएसयुआयमध्ये प्रवेश घेतला. संचालन व आभार अनिल मांडके यांनी केला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The role of youth in politics is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.