प्रश्नोत्तराच्या तासाने अधिकाºयांची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:27 PM2017-09-13T23:27:05+5:302017-09-13T23:27:33+5:30
जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा आज बुधवारला सभागृहात घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा आज बुधवारला सभागृहात घेण्यात आली. या सभेत विषय सुचीनुसार पहिलाच विषय रात्री ७ वाजेपर्यंत रंगला. हा विषय 'प्रश्नोत्तराचा तास' म्हणून ठेवण्यात आला होता. या विषयावर अधिकाºयांची मोठी धावाधाव झाली.
जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोकर यांच्या सभाध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या सभेला उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, अर्थ व बांधकाम सभापती विनायक बुरडे, समाजकल्याण सभापती निलकंठ टेकाम, मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा घेण्यात आली.
या सभेपूर्वी जिल्हा परिषद सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याकडे त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगितले. त्यानुसार सुरूवातीला सदस्यांकडून प्रश्न घेण्यात आले. दिलेल्या प्रश्नांपैकी महत्वाचे प्रश्नांची निवड करून आजच्या सर्वसाधारण सभेत विषयसूचित पहिला विषय प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. दुपारी २ वाजतापासून सुरू झालेली ही सर्वसाधारण सभा रात्री ७ वाजेपर्यंत केवळ विषयसूचितील पहिल्या विषयावरच रंगली.
सदस्यांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना उपस्थित विभाग प्रमुखांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. अनेक अधिकाºयांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न यावेळी केला. दरम्यान काही सदस्यांनी समयसुचकता दाखवून अधिकाºयांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली आहे. त्यामुळे या सभेत विकासात्मक निर्णय घेण्यात आले नाही. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या सभेत कोणत्या महत्वाच्या विषयावर चर्चा झाली ही बाब मात्र गुलदस्त्यात राहली.
सभापती-सदस्यांमध्ये खडाजंगी
सभागृहात सभा सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी यांनी विकासात्मक कामावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांनी भूमिका मांडली. डहारे यांच्या भूमिकेमुळे नाराज झालेल्या रमेश पारधी यांनी डहारेंना खडेबोल सुनावले. यामुळे डहारे यांनीही पारधी यांना उत्तर दिले. यामुळे डहारेविरूद्ध पारधी असा काही क्षण शाब्दिक खडाजंगी सभागृहातील सदस्यांनी अनुभवला.
विषयसूचितील पहिल्या विषयानुसार प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. मात्र या तासालाच रात्रीपर्यंत चर्चा सुरू राहीली. आचारसंहिता असल्याने अर्थसंकल्प सादर करता आला नाही.
-राजेश डोंगरे, उपाध्यक्ष जि.प. भंडारा