कोरोंना जनजागृतीसाठी रूट मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:24 AM2021-06-10T04:24:11+5:302021-06-10T04:24:11+5:30
लाखनी : तालुका प्रशासन व पोलीस विभागातर्फे लाखनी शहर व ग्रामीण भागात रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. ...
लाखनी : तालुका प्रशासन व पोलीस विभागातर्फे लाखनी शहर व ग्रामीण भागात रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यात कार्यक्रमात तहसीलदार मलिक विराणी, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, पोलीस निरीक्षक मनोज वाडीवे, नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी गुंजन फेंडर, नगरपंचायतचे अभियंता राधेश्याम इंगोले, तालुका समन्वयक नरेश नवखरे, पोलीस विभागातील विविध पथक, महसूल पथक, ग्रामपंचायत व पंचायत समिती पथक, नगर परिषद विभाग पथक, दंडात्मक कारवाई वसुली पथक इत्यादी उपस्थित होते.
यावेळी संपूर्ण शहराला रूट मार्चच्या माध्यमातून कोरोनाविषयक लढाई यशस्वी जिंकण्यासाठी कटिबद्ध राहण्याची व शासन नियमांचे पालन करण्याच्या संबंधी अवगत करण्यात आले. त्यासाठी सामाजिक अंतर पाडणे, मास्क वापर करणे सॅनिटायझरचा वापर करणे आणि प्रसंगानुसार प्रशासनाला मदत करणे इत्यादी गोष्टी सर्वांनी अंमलात आणण्याबत मार्गदर्शन केले. ज्या दुकानदार किंवा वृद्ध नागरिकांनी मास्कचा वापर केला होता त्यांना गुलाब फुल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोनाविषयक नियमांचे पालन न केल्यामुळे केलेल्या दंडात्मक कारवाई करून २३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.