बंधाऱ्याची पाळ फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:57 PM2018-07-10T22:57:21+5:302018-07-10T22:57:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : तुमसर तालुक्यातील पवनारा येथे कृषी विभागाअंतर्गत बांधलेल्या वनराई बंधाऱ्याची पाळ फुटली. यात रस्ता वाहून गेला. परिणामी शेतकऱ्याचा जाण्याचा मार्ग पूर्णत: बंद झाला आहे. खड्डा दुरुस्तीबाबत कृषी विभागाला निवेदन देण्यात आले आहे.
पवनारा येथील शेतकरी भगवानदास वरठे यांच्या शेताजवळ कृषी विभागांतर्गत वनराई बंधारा बांधलेला आहे. पाण्याच्या प्रवाहाने बंधाऱ्याच्या बाजूने पाळ फुटल्यामुळे लागून असलेला पांदण रस्त्याच वाहून गेला. खड्ड्यात रस्ता असा प्रकार निर्माण झाला.
विहिरीसारखा मोठा १० फूट खोल तर १५ फूट अरुंद खड्डा पडल्यामुळे शेतकऱ्याची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पांदन रस्त्याने ४० ते ५० शेतकऱ्यांना दररोज स्वत:च्या बंडीबैलासह आवागमन करून शेतीचे काम पूर्ण करावी लागत आहेत. रोवणीची वेळ शेतकºयांना रहदारीला अडचण होत आहे.
अशा स्थितीत शेतीचे कामे करावे कसे? असे नानाविध प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत. खड्ड्याजवळून गेल्यामुळे माती कोसळते. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.