रानडुकरांचा शेतात धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 09:46 PM2017-11-09T21:46:27+5:302017-11-09T21:46:38+5:30
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. दिवसा नदी काठाजवळ राहून रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. दिवसा नदी काठाजवळ राहून रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. वन कायद्यामुळे हात बांधलेले असल्यामुळे या प्राण्यांच्या बंदोबस्ताकरिता अडचणी येत आहेत. त्यामुळे पिकांचे सुमार नुकसान सहन करावे लागत आहे.
पालांदुरात मºहेगाव नाल्याजवळ वनराई व दाट झुडपे आहेत. त्या परिसरात वन्यप्राण्यांना लपून राहण्यासाठी सुरक्षा मिळत आहे. या सुरक्षेपासून शेतातील धान व कडधान्य पिकांचे सुमार नुकसान होत आहे. वनविभागाचे कर्मचारी किटाडी व अड्याळ येथे कार्यरत असल्याने नुकसानग्रस्त शेतकरी माहिती द्यायला व कागदी प्रक्रिया करण्याकरिता कमी पडत आहे. यात शेतकºयांचे दररोज नुकसान होत आहे. यामुळे शेतकºयांच्या होणाºया नुकसानीचे पंचनामे होत नाही. परिणामी शेतकºयांना न्याय मिळत नाही. वनविभागाने शेतकरी हितार्थ धोरण राबवित शेतकºयांना सकारात्मक सहकार्य करावे, अशी मागणी पालांदूर, मºहेगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.
वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्याने वनक्षेत्राधिकारी, बीटरक्षक, वनरक्षक यांना सूचना देणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त शेतात पंचनामा करून पिकांचे नुकसान बघून भरपाई देण्यात येईल.
- हनुमंत मुसले, वनरक्षक,
किटाडी वनविभाग.