रोवणी @ ६० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:17 AM2017-08-27T00:17:45+5:302017-08-27T00:18:34+5:30
पावसाने दडी मारल्याने वर्षभरासाठी आवश्यक असणाºया पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, तर धरणे अजून अर्धीही भरलेली नाहीत.
देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पावसाने दडी मारल्याने वर्षभरासाठी आवश्यक असणाºया पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, तर धरणे अजून अर्धीही भरलेली नाहीत. त्यामुळे यावर्षी पाण्याचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी ६२३.१ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी आत्तापर्यंत सरासरी ६७७.६ मिमी इतका पाऊस झाला होता. जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात आहे. लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत असलेल्या प्रकल्पात केवळ २८.६४ टक्के जलसाठा आहे. भंडारा जिल्ह्यात १ लाख ८२ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी आतापर्यंत केवळ १ लाख २ हजार ८१३ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली. यातही रोवणीची टक्केवारी ६० टक्के असल्याची सांगण्यात येते.
कमी पावसामुळे तलाव, बोड्यात अजुनही अत्यल्प जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरमधील शेती धोक्यात सापडली आहे. नैसर्गिक संकट गंभीर दिसू लागले असून भिषण दुष्काळाची परिस्थिती आजही कायम आहे. सिंचनाच्या पाण्याची बोंबाबोंब आहे. अपुºया पावसामुळे हजारों एकर शेती अजुनही पडीत आहे. रोवणी झालेली नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची पर्याप्त साधने आहेत. त्यांनी कशीबशी रोवणी आटोपली असली तरी बेपत्ता पावसाने शेतीला पडलेल्या भेगा अजुनही शेतकºयांच्या मनात खोलवर जखम करुन आहेत. पºह्यांचा कालावधी दोन ते अडीच महिन्यापर्यंत पोहचला आहे. आता हलक्या धानाची रोवणी करण्यास शेतकºयांचा नकार असून हजारो एकर शेती पडीत राहणार आहे. पावसाने दडी मारल्याने पºहे वाळली, रोग व किडीची प्रादुर्भाव जाणवल्याने शेतकरी हतबल आहे.