एमआयईटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले रोटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:40 PM2018-04-16T22:40:23+5:302018-04-16T22:40:23+5:30

शेती आज तोट्याची झाली असल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व योगा कृषीविषयक मार्गदर्शन योग्य नियोजन भरवशावर शेतीतून समृद्धीकडे वाटचाल करीत आहेत.

Rotavater created by MIET students | एमआयईटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले रोटाव्हेटर

एमआयईटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले रोटाव्हेटर

Next
ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान: कमी किमतीत शेतीउपयोगी यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर : शेती आज तोट्याची झाली असल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व योगा कृषीविषयक मार्गदर्शन योग्य नियोजन भरवशावर शेतीतून समृद्धीकडे वाटचाल करीत आहेत. याला जोड एमआयईटीच्या विद्यार्थ्यांनी कमी किमतीत कमी आकारमान व वजनाचा यशस्वी रोटाव्हेटर तयार करून शेतीउपयोगी यंत्र विकसीत केले.
गरज ही शोधाची जननी आहे. या म्हणी आहे आणि या गरजेतूनच अनेक वस्तु व यंत्रांचा शोध लागतो. शेतकऱ्यांची गरज ओळखून जवळील शहापूर येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी अशा रोटाव्हेटरची निर्मिती केली आहे. आज निसर्गामध्ये बदल पाहावयास मिळत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.
काबाडकष्ट करूनही अनेकदा शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. शेतकरीही काळानुरूप बदलत आहेत. आधुनिक शेतीची कास धरत आहेत. बैलाऐवजी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. मात्र बाजारात कृषी यंत्राची किंमतही साधारण शेतकऱ्यांना परवडणारी नाही. हीच बाब हेरून अक्षय लेदे, अमित गिऱ्हेपुंजे, धिरज तिरपुडे, नरेश दडमल, संदीप वंजारी, सुमित गजभिये यांनी ज्ञानाचा उपयोग करीत सामान्य शेतकऱ्यांना परवडेल असे रोटाव्हेटर व बेडरिमेकर यंत्र तयार केले. या यंत्राचा उपयोग शेत तयार करणे, माती बारीक करणे, पीक लागवडीसाठी सरी तयार करणे पिकातील तण काढणे असे बहुआयामी कामे केली जाते.
बाजारात उपलब्ध असलेल्या यंत्राच्या तुलनेत हे यंत्र शेतकऱ्यांना अगदी माफक दरात उपलब्ध होईल. या यंत्राचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रा. गिरीश भिवगडे, प्रा. अजय मोतीवाल, चाफले, देशकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेले यंत्र हे बाजारातील यंत्रापेक्षा कमी किंमतीचे आहे. यामुळे पैशांची बचत होऊन वेळेचीही बचत होणार असल्याचे मत प्रगतीशिल शेतकरी वासूदेव गिºहेपुंजे यांनी व्यक्त केले.

Web Title: Rotavater created by MIET students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.