दीड लाख हेक्टरवरील रोवणी प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 05:00 AM2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:00:55+5:30

भंडारा जिल्ह्यात एक लाख ६१ हजार ४९३ हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार मशागत करून शेतात पऱ्ह्यांची नर्सरी तयार केली. रोहिणी मृग नक्षत्रात चांगला पाऊस बरसला. शेतकरी सुखावला. मात्र आर्द्रा नक्षत्रात पावसाने दडी मारली. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या. रोवणीचे सोड शेतातील नर्सरीतील पऱ्हे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागली.

Rowani affected 1.5 lakh hectares | दीड लाख हेक्टरवरील रोवणी प्रभावित

दीड लाख हेक्टरवरील रोवणी प्रभावित

Next
ठळक मुद्देपाऊस लांबणीवर : दुबार पेरणीचे संकट बळावण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: वैनगंगा नदीकाठासह सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी धानरोवणी केली असली तरी पावसाअभावी शेतकरी संकटात आले आहेत. सिंचनाची सोय असलेल्या भागासह ईतर ठिाणी पाच टक्के क्षेत्रात रोवणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे पावसाअभावी दीड लाख हेक्टरवरील रोवणी रखडली असून दुबार पेरणीचे संकटही बळावले आहे.
भंडारा जिल्ह्यात एक लाख ६१ हजार ४९३ हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार मशागत करून शेतात पऱ्ह्यांची नर्सरी तयार केली. रोहिणी मृग नक्षत्रात चांगला पाऊस बरसला. शेतकरी सुखावला. मात्र आर्द्रा नक्षत्रात पावसाने दडी मारली. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या. रोवणीचे सोड शेतातील नर्सरीतील पऱ्हे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागली. ओलीताचे क्षेत्र असलेले शेतकरी सिंचनाने पऱ्हे जगवू लागले. परंतु कोरडवाहू शेतकरी डोक्यावर गुंडाने पाणी आणून पºह्यांना जगवित असल्याचे चित्र दिसू लागले.
एकूण लागवड क्षेत्राच्या केवळ ५६७७.२८ हेक्टरवर आतापर्यंत रोवणी आटोपली आहे. त्यातही ओलीताची सोय असलेल्या शेतकºयांचाच सर्वाधिक समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रोवणी तुमसर तालुक्यात १३५३ हेक्टर तर सर्वात कमी साकोली तालुक्यात ३६७ हेक्टरवर रोवणी झाली आहे. जिल्ह्यात १३ हजार १६ हेक्टर क्षेत्रावर नर्सरी टाकण्यात आली होती.
गत आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणी केलेल्या अनेक शेतात भेगा पडल्या असून पºहे करपू लागली आहेत. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने कोरडवाहू असलेल्या मोहाडी,भंडारा तालुक्यातील शेतकरी प्रकल्पातील पाणी सोडण्याची मागणी करीत आहेत. कमी पाऊस असलेल्या मोहाडी तालुक्यातील कोरडवाहू करडी परिसरात सुमारे ५,४६४ हेक्टर आर क्षेत्रात धान पिकाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सुमारे १९७ हेक्टर क्षेत्रात धुऱ्यावर तूर पिकाची लागवड परिसरात करण्यात आली.
जिल्ह्यात जंगल मोठ्या प्रमाणात असतानाही पाऊस कमी होत चालल्याने शेतकरी धास्तावला आहे. गत वर्षी पुरेसा पाऊस झाला असताना असताना भुगर्भात पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. अनेक तलावांतील अतिक्रमणे व उथळपणांमुळे जलसाठा राहत नाही. विहिर खोदली तरी खरीपातही पाणी पुरत नाही.
अशा बिकट परिस्थितीतही निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत शेतकरी आजही चांगल्या उत्पन्नाची आशा धरून आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या प्रारंभी रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडा गेल्यानतर शेतकऱ्यांना रोवणी कशी करायची असा प्रश्न पडला आहे.
काही आठवड्यापासून शेतकरी तापमानाने शेतकरी हैराण झाले आहेत. पेरण्या झालेल्या शेतातील पऱ्हे कडक उन्हामुळे पाण्याविना करपू लागली आहेत. सिंचनाची साधने असलेल्या शेतकऱ्यांच्या रोवणी झालेल्या शेतात भेगा पडल्याने रोवण्या थांबविण्यात आल्या आहेत. आणखी काही दिवसांत पाऊन न झाल्यास केलेली शेतकऱ्यांची मेहनत व पैसा वाया जाण्याची भिती शेतकऱ्याना सतावत आहे.

जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असतांना केवळ आठ तास वीज पुरवठा होत असल्याने सिंचन करता येत नाही. त्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी बारा तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. नागपूर जिल्ह्यात १२ तास वीज पुरवठा होतो. तर भंडारा जिल्ह्यात कोणती समस्या आहे. असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. विजेसाठी शेतकरी विज वितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे.

Web Title: Rowani affected 1.5 lakh hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.