४९ रुपयांचे एन-९५ मास्क ८० ते १२० रुपयांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 05:00 AM2020-10-30T05:00:00+5:302020-10-30T05:00:16+5:30

एन -९५ मास्कची आम्ही कुठल्याही जास्त दराने विक्री केलेली नाही. याउलट आमच्याकडे जेनेरिक मेडिकल औषधी अंतर्गत २५ रुपयांपर्यंत मास्क उपलब्ध आहे. ग्राहकांना सहजपणे मास्क उपलब्ध होेत आहे. कुठल्याही शासकीय आदेशांचे उल्लंघन केलेले नाही. परंतु कुणाचेही नुकसान होऊ नये याचीही राज्यशासनाच्यावतीने काळजी घेतली पाहिजे. 

Rs 49 N-95 mask at Rs 80 to Rs 120 | ४९ रुपयांचे एन-९५ मास्क ८० ते १२० रुपयांत

४९ रुपयांचे एन-९५ मास्क ८० ते १२० रुपयांत

Next
ठळक मुद्देआदेशाबाबत असंतोष : औषधी विक्रेत्यांचे होतेय लाखोंचे नुकसान

इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरात तीन ते ४९ रुपयांचे मास्क ऐंशी ते १२० रुपयात विकले जात असले तरी त्याा ग्राहकांचा अल्प प्रतीसाद आहे. शासकीय दराप्रमाणे कंपनीने मास उपलब्ध केले नसल्याचा दावा औषध विक्रेत्यांनी केला आहे. यात शासनाने एन-९५ मास्कचे शासकीय दर निर्धारित केले आहे. अजूनपर्यंत या मास्कचा पुरवठा झालेला नाही. खाजगी कंपन्यांचे जुने मास्क प्रिंट रेटने विकले जात आहेत. बाजारपेठेत कापडी मास्क विक्री करणारी कुठलीही कारवाई न करता शासनाने परवानाधारक औषध विक्री दुकानदारांना वेठीस धरण्याचे प्रयत्न करीत असल्याच्या आरोपही केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने केला आहे
सरकारचा नव्या निर्णय....
एन -९५ मास्कची आम्ही कुठल्याही जास्त दराने विक्री केलेली नाही. याउलट आमच्याकडे जेनेरिक मेडिकल औषधी अंतर्गत २५ रुपयांपर्यंत मास्क उपलब्ध आहे. ग्राहकांना सहजपणे मास्क उपलब्ध होेत आहे. कुठल्याही शासकीय आदेशांचे उल्लंघन केलेले नाही. परंतु कुणाचेही नुकसान होऊ नये याचीही राज्यशासनाच्यावतीने काळजी घेतली पाहिजे. 
-दुर्गेश माकडे, जेनेिरक मेडीकल स्टोर्स, भंडारा 

असोसिएशनची बाजुही महत्वाची
राज्य शासनाने दिलेल्या वेळोवेळी सूचनांचे आम्ही इमानेइतबारे पालन करीत असतो मात्र असोसिएशनचे म्हणणे अजून पर्यंत ऐकून घेण्यात आलेले नाही परिणामी अनेक औषध दुकानदारांना याचा आर्थिक फटकाही बसला आहे. धोरण निश्चित करण्यापूर्वी संघटनेचेही म्हणणे किंवा त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे होती. जास्त दराने मास्क विकण्याचा प्रश्नच नाही.
-संजय निंबार्ते, निंबार्ते मेडीकल स्टोर्स, भंडारा 

मास्क उपलब्ध झाले पाहिजे
आमच्यापर्यंत शासकीय दराने उपलब्ध असलेले मास्कचा पुरवठा आम्हाला आलेला नाही. परिणामी जास्त दराने एन ९५ मास्कची विक्री करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शहरातील गल्लीबोळीतही सुती कापडापासून निर्मित मार्चची विक्री होत आहे. पण नियम फक्त आमच्यासाठी आहे. ग्राहकही जागरूक आहे. आम्हाला ज्या दरात मास्क उपलब्ध होइल त्याच दरात आम्ही विक्री करू.
-सोनु कुरंजेकर, बाळकृष्ण मेडीकल स्टोर्स, भंडारा

कुणाचीही तक्रार नाही
राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार निरीक्षण सुरू करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत जास्त दराने मास्कची विक्री होत असल्या बाबतची तक्रार आलेली नाही. दुकानदारांनी ठरलेल्या यराप्रमाणे मास्कची विक्री करावी.
- प्रशांत रामटेके 
सहायक आयुक्त, अन्न व 
औषध प्रशासन विभाग, भंडारा

Web Title: Rs 49 N-95 mask at Rs 80 to Rs 120

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.