लहरीबाबा देवस्थानाला ४५ लाखांचा निधी

By admin | Published: September 14, 2015 12:20 AM2015-09-14T00:20:01+5:302015-09-14T00:20:01+5:30

जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान साकोलीला सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच या मठाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ...

Rs.45 lakh fund for Lahiri Baaba Devasthan | लहरीबाबा देवस्थानाला ४५ लाखांचा निधी

लहरीबाबा देवस्थानाला ४५ लाखांचा निधी

Next

नाना पटोले यांचा पुढाकार : तीर्थस्थळ घोषित झाल्यानंतर घेतला आढावा
साकोली : जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान साकोलीला सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच या मठाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे निधी येणारच असला तरी खासदार निधीतून पुन्हा ४५ लाख रुपयाची घोषणा खा. नाना पटोले यांनी केली. पोळ्याच्या दिवशी मठात सदिच्छा भेटीदरम्यान घोषणा केली. तीर्थस्थळाचा आढावा घेऊन तालुक्यातील पोंगेझरा महादेव देवस्थान शिवणटोला व कोल्हासूर पहाडी मंदिर, सितेपार, विर्शी याही मंदिरांना सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.
संत श्री लहरीबाबा हे या पंचक्रोशीतील लोकांचे श्रद्धास्थान आहे. साकोली येथे असलेल्या लहरीबाबा मठ व मंदिराच्या दर्शनासाठी परिसरासह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील हजारो भक्तगण दर्शनाकरिता येतात. या उत्सवाला हजारो लोकांची उपस्थिती असते. मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण तसेच सर्व मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचेही यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.
यावेळी या देवस्थानाचे अध्यक्ष अशोक गुप्ता, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासूरकर, माजी उपसरपंच किशोर पोगळे, शहर अध्यक्ष मंदार खेडीकर, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, डॉ.अनिल मारवाडे, श्याम गुप्ता व देवस्थानाचे पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rs.45 lakh fund for Lahiri Baaba Devasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.