नियमबाह्य युनिव्हर्सल कारखाना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2015 01:03 AM2015-07-31T01:03:21+5:302015-07-31T01:03:21+5:30
तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना कंपनी व्यवस्थापनाने नियमबाह्यपणे सन २००२ मध्ये ८०० कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली.
उद्योगमंत्र्यांकडे तक्रार: जबरदस्तीने ८०० कामगारांना स्वेच्छानिवृत्ती, ३१५ कामगारांना कामावरून काढले
तुमसर : तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना कंपनी व्यवस्थापनाने नियमबाह्यपणे सन २००२ मध्ये ८०० कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली. पुन्हा सन २००६ मध्ये ३१५ कामगारांना नियमबाह्यपणे कामावरून कमी केले, असा आरोप राष्ट्रीय मजदूर मंचने लावला आहे. या कारखान्यात स्थायी व अस्थायी असे दोन हजार कामगार कार्यरत होते. संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणीही केली आहे.
सन २००२ मध्ये या कारखान्यावर कोट्यावधीचा वीज बिल थकीत होता. तो थकीत बिल कंपनी व्यवस्थापनाने न भरल्याने वीज मंडळाने कारखान्याची वीज कापली होती. कारखाना बंदवेळी येथे इंटकचे युनियन होते. या संघटनेशी कंपनी व्यवस्थापनाने कोणतीच चर्चा केली नाही. विना चर्चेने कारखान्याने क्लोजड डाऊन करण्याचा निर्णय घेतला. कारखाना प्रशासनाने औद्योगिक विभाग अधिनियम १९४७/२५ के (एफएफए) चे पालन केले नाही. कारखाना प्रशासन बी.आय.एफ.आर. मध्ये जाण्याची गरज होती. कामगार संघटनेत सुद्धा बीआयएफार मंडळाकडे गेली नाही.
सन २००२ मध्ये ८०० कामगारांना नियमबाह्य स्वेच्छा निवृत्ती घेण्यास बाध्य करण्यात आले. २००६ मध्ये पुन्हा ३१५ कामगारांना नियमबाह्य घरचा रस्ता कंपनी व्यवस्थापनाने दाखविला. हा कारखाना बंद झाल्याने स्थायी व अस्थायी सुमारे दोन हजार कामगार बेरोजगार झाले. तुमसर शहराच्या आर्थिक निवासावर यामुळे विपरीत परिणाम झाला आहे.
या कारखाना परिसरात हजारो टन मॅग्नीजचा साठा पडून आहे. मोठ्या प्रमाणात या परिसरात मॅग्नीजचा साठा आहे. या कारखान्या संदर्भात राज्य शासनाने निर्णय करावा. कारखाना पुन्हा सुरू करावा अन्यथा या कारखान्याची विक्री संदर्भात शासनाने दखल घ्यावी. कामगारांना नियमबाह्यपणे स्वेच्छानिवृत्ती होण्यास भाग पाडणे, विज बिलाचा गुंता, कामगारांची देणी शिल्लक आहे ती त्वरीत अदा करण्याची मागणी राष्ट्रीय मजदूर मंचचे अध्यक्ष हरीहर मलीक यांनी राज्याच्या उद्योगमंत्र्याकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)