सर्वच पक्षात उमेदवारीसाठी धावपळ

By admin | Published: June 8, 2015 01:06 AM2015-06-08T01:06:15+5:302015-06-08T01:06:15+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी होतील याचे अंदाज बांधले जात होते.

Runway for the candidature of all the parties | सर्वच पक्षात उमेदवारीसाठी धावपळ

सर्वच पक्षात उमेदवारीसाठी धावपळ

Next

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : नवखे चेहरे मैदानात उतरणार
मोहाडी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी होतील याचे अंदाज बांधले जात होते. अखेर निवडणुकीचा बिगूल वाजला. आता उमेदवारीसाठी सर्वच राजकीय पक्षात कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच निवडणुकीत उतरू पाहणारे कार्यकर्ते नेत्यांच्या मनधरणीला लागले आहेत. आरक्षणामुळे फटका बसलेल्या नेत्यांना कुठून लढावे हा प्रश्न पडला आहे. आता मोहाडी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सात विभाग पाडले गेले आहे. यात कांंद्री, डोंगरगाव, आंधळगाव, खमारी बुज, वरठी, बेटाळा व करडी या गटाचा समावेश आहे. कांद्री जिल्हा परिषद सोडला तर सर्वच गटामध्ये आरक्षणामुळे विद्यमान सदस्याची गोची झाली आहे. स्वभाविकच डोंगरगाव, आंधळगाव, खमारी बुज, वरठी, बेटाळा, करडी या क्षेत्रासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार नवीन राहणार आहेत. तसेच पंचायत समितीचे कांद्री, जांब, उसर्रा, डोंगरगाव, आंधळगाव, हरदोली, खमारी बुज, पाचगाव, वरठी, मोहगावदेवी, बेटाळा, पालोरा, देव्हाडा र्खुद व करडी असे चौदा क्षेत्र आहेत. इथेही आरक्षणामुळे अनेकांना प्रतिबंध बसला आहे. यावेळी मोहाडी पंचायत समितीच्या सभागृहात नवीन चेहरे येण्याची शक्यता आहे.
केंद्र, राज्य तसेच भंडारा जिल्हा परिषद, मोहाडी पंचायत समितीत भाजपचाच बोलबाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य बनण्यासाठी अनेक कार्यकर्ते उत्सूक आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीसाठी आपसात संघर्ष होण्याची शक्यता बळावली आहे. 'अच्छे दिन'च्या नावाखाली आपली पूंजी वाजू शकते ही भावना भाजपच्या तिकीट मागणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते. पण, सध्या 'अच्छे दिन'ची हवा ओसरल्याचे चित्र आहे. पण, जिल्ह्यात भाजपाचे तीन आमदार व खासदार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला आहे. आज सद्यातरी या जोमात उमेदवारी घेण्यासाठी भाजपमध्ये रिघ लागल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचा वजन आहे. तगडे आवाहन देणारे कार्यकर्ते आहेत. या वेळेस निवडणुका तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यामध्येच दिसून येतील. काँग्रेस पक्षाचा नाव असला तरी लढा वृत्ती असणारे तालुक्यात नेतृत्व नाही. यामुळे मोहाडी तालुक्यात काँग्रेस कमजोर पडली आहे.
राष्ट्रवादी पक्षात तिकीटांसाठी इच्छूक असणारे बरेच आहेत. येथेही जेष्ठांना उमेदवारी देताना चांगलीच दमछाक करावी लागणार आहे. १३ जूनपर्यंत सर्वच पक्षाच्या उमेदवारांची नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. इच्छूक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे आपले अर्ज भरले आहेत. आठवड्याभरात उमेदवारी निश्चित करण्यासाठी सर्वच पक्ष मुलाखती घेतील, असा कयास आहे. यावेळी शिवसेना चांगल्या ताकतीने लढणार आहे. कारण शिवसेना राज्यात युतीच्या सत्तेत आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण ताकत शिवसेना झोकून देणार आहे. अगदी तोंडावर निवडणुका आल्याने भाजपा- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस-काँगे्रेस या एकात राहून लढतील याची शक्यता आता कमी झाली आहे. स्थानिक पातळीवर तत्परतेने युती, आघाडी झाली तर निवडणुकीचे येणारे निकाल वेगळे बघायला मिळतील. पण, सोबत लढण्याची भाषा युती व आघाडीमधील कोणतेच नेते व कार्यकर्तेही करतानी दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, काँग्रेस, शिवसेना हे चार पक्ष आपली शक्ती वेगवेगळी अजमावतील.
मोहाडी तालुक्यात भाजपाला आपली प्रतिष्ठा कायम ठेवायचे आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस या दोन पक्षाला आपल्या अस्तित्वाची लढाई लढायची आहे. आज स्थितीत कोणत्या पक्षाची हवा आहे हे कोणालाच सांगता येणार नाही. उमेदवारी निश्चित झाल्यानंतरच सगळे अंदाज बांधले जाणार आहेत. पक्षाच्या नावावर व स्वत:च्या व्यक्तिमत्त्वावर तसेच निवडणुकीत कोण किती अर्थ ओततो, यावरही सगळं काही संभव आहे. साधारणत: १५ जूननंतर लढती कशा होतील, कोणाची बाजू भक्कम राहील याचे नक्की अंदाज बांधले जावू शकतील. सध्या निवडणुकीच्या चर्चेला उधाण आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Runway for the candidature of all the parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.