आॅनलाईन कर्जमाफीच्या नोंदणीसाठी शेतकºयांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 11:03 PM2017-09-02T23:03:21+5:302017-09-02T23:03:45+5:30
राज्य शासनाने शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आॅनलाईन अर्जाची नोंदणी करण्याची अट लागू केली आहे.
रंजित चिंचखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : राज्य शासनाने शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आॅनलाईन अर्जाची नोंदणी करण्याची अट लागू केली आहे. परंतु अर्धे अधिक शेतकरी वयोवृद्ध आणि विविध आजाराने ग्रस्त असल्याने पित्यासोबत पाल्याचीही डोकेदुखी वाढली आहे. गावातच आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याची सोय उपलब्ध करून देण्याची ओरड सुरु झाली आहे.
राज्य शासनाने शेतकºयांना कर्जमाफी देताना आॅनलाईन अर्जाची नोंदणी करण्याची अट लागू केली आहे. अर्ज अपडेट करण्यासाठी तालुकास्तरावर काही महा आॅनलाईन केंद्रांना मंजुरी दिली आहे. कर्ज घेणाºया शेतकºयांची संख्या मोठी असल्याने आॅनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरु झाली आहे. गावापासून ३० ते ३० कि.मी. अंतरावर ही महाआॅनलाईन केंद्र असल्याने वयोवृद्ध शेतकºयांची फजीती होत आहे. तरुण शेतकºयांची संख्या नगण्य आहे. वयोवृद्ध शेतकºयांचे नावावर शेती असल्याने वाढत्या वयानुसार शरीर थकले आहे. याशिवाय वयोवृद्ध शेतकरी अनेक आजाराने पीडित आहेत. बहुतांश शेतकरी अंथरुणाला खिळली आहे. सिहोरा परिसरात बहुतांश शेतकºायंनी ७० वर्षाचा पल्ला गाठला आहे. म्हातारवयात या शेतकºयांना कर्जमाफीच्या अर्जाची नोंदणी करण्याची जबाबदारी त्यांचे पाल्यावर आली आहे. आॅनलाईन अर्जाची नोंदणी करताना पतीपत्नी या शेतकºयाची आवश्यकता आहे. घरातील अपत्य वयोवृद्ध माता पिण्यांना कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी महाआॅनलाईन केंद्रावर घेऊन जात आहेत. दिवसभर या केंद्रावर प्रतीक्षा करण्याची पाळी येत असल्याने पाल्यांचा रोजगार बुडत आहे. महा आॅनलाईन केंद्रावर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वय वाढत असल्याने अनेक शेतकरी लखवा आजाराने ग्रस्त आहे. अनेकाच्या डोळ्यांना दिसत नाही. यामुळे अर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी जाताना या शेतकºयांची कसरत होत आहे. या शेतकºयांना वंचित राहण्याची पाळी आली आहे. दरम्यान गावात ग्रामपंचायतमध्ये डाटा आॅपरेटर कार्यरत आहेत. गावातच आॅनलाईन भरण्याची मंजुरी देण्यात आली नाही. यामुळे शेतकºयांचे नाकी नऊ येत आहे. लांब पल्ल्याचे अंतर गाठण्यासाठी गावात सोयीचा अभाव आहे. लखवा अजाराने पीडित कर्जबाजारी शेतकरी आॅनलाईन अर्जाची नोंदणी करण्यासाठी तालुक्याचे ठिकाण गाठणार नाही. या शेतकºयांना घरपोच तथा गावात सोय उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न नाही. यामुळे अंथरुणावर असणारे शेतकरी टेंशनमध्ये आली आहे. शेती आणि कर्जाची नोंद तरुण अपत्याचे नावावर नाही. वयोवृद्ध शेतकºयांचे नावावर आहे. यामुळे अपत्य अडचणीत आले आहे. ग्राम पंचायतमध्ये डाटा आॅपरेटर मार्फत कर्ज माफीचे अर्ज नोंदणी करण्याची ओरड गावात सुरु झाली आहे. कर्जमाफीचे लाभ घेण्यासाठी शासनाने डाटा आॅपरेटरांना गावातच शेतकºयांचे अर्जाची नोंदणी करण्याचे अधिकार आणि आदेश देण्यात यावे अशी ओरड गावात सुरु झाली आहे.
शासनाने कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज नोंदणीसाठी काही केंद्रांना मंजुरी दिली आहे. परंतु शेतकरी वयोवृद्ध व आजाराने पीडित असल्याने अर्जाची नोंदणी त्रासदायक आहे. गावातील डाटा आॅपरेटरवर शासनाचा भरवसा नाही काय? यांना अधिकार व आदेश देण्याची गरज आहे.
-मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ, सिंदपुरी