ग्रामीण जनतेची लसीकरणाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:57+5:302021-04-30T04:44:57+5:30
कोरोनाशी लढा देण्यासाठी गावपातळीवर लसीकरण शिबिर आयाेजित केले जात आहे. परंतु, ग्रामस्थ त्याला प्रतिसाद देत नाही. राज्यात कोविड लसीची ...
कोरोनाशी लढा देण्यासाठी गावपातळीवर लसीकरण शिबिर आयाेजित केले जात आहे. परंतु, ग्रामस्थ त्याला प्रतिसाद देत नाही. राज्यात कोविड लसीची टंचाई आहे. परंतु तुमसर तालुक्यात आरोग्य विभाग लसीकरणाकरिता सतत प्रयत्नशील असून गावात लसीकरण केंद्र आयोजित करीत आहे. त्या केंद्राकडे नागरिकांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसून येते. गुरुवारी तुमसर तालुक्यात १७ ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. परंतु त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. लसीकरण केंद्रावर नागरिकांचा अल्प प्रतिसाद दिसून आला. काही गावांमध्ये लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने चिंता प्रकट केली. नागरिकांना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही त्यांनी लसीकरण करून घेतले नाही.
तुमसर तालुक्यातील रणेरा, हसारा, नवरगाव, आष्टी, पवनार खारी, मुरली, डोंगरी बुजरूक, खापा, पाथरी, पचारा, हरदोली, देवनारा, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हाडी नाकाडोंगरी ग्रामीण रुग्णालय सिहोरा येथे लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या सर्व केंद्रांवर नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला.
काेट
तुमसर तालुक्यात थेट गावात लसीकरण करण्याकरिता शिबिर घेतले जात आहे. परंतु ग्रामस्थ लसीकरण करण्याबद्दल इच्छुक नाहीत. लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. लस ही पूर्णतः सुरक्षित असून लसीकरणामुळे आपल्याला सुरक्षाकवच प्राप्त होणार आहे.
डॉ. एम.ए. कुरैशी,
तालुका आरोग्य अधिकारी, तुमसर