ग्रामीण नळयोजना व कृषीपंपाची वीज कापू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:32+5:302021-06-25T04:25:32+5:30

भंडारा जिल्ह्यासह तुमसर- मोहाडी तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिवे व कृषी पंपाची वीजवितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडित करण्यात ...

Rural pipelines and agricultural pumps should not be cut off | ग्रामीण नळयोजना व कृषीपंपाची वीज कापू नये

ग्रामीण नळयोजना व कृषीपंपाची वीज कापू नये

Next

भंडारा जिल्ह्यासह तुमसर- मोहाडी तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिवे व कृषी पंपाची वीजवितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्या समस्याची दखल घेत आमदार राजू कारेमोरे यांनी मंगळवारला मुबंई मंत्रालयात राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्या सोबत चर्चा करून सदर समस्याची निवेदनाच्या माध्यमातून जाणीव करून दिली. लाॅकडाऊनने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर फार वाईट परिणाम झालेला असून, अनेकांची आर्थिक स्थिती डबघाईस आलेली असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात घट झाली आहे, त्यामुळे ते दिवाबत्ती व पाणी पुरवठा वीज बिल भरण्यास सध्या तरी असमर्थ आहेत. तर शेतकऱ्यांचीसुद्धा तीच अवस्था असल्याने त्यांना वेळ देण्यात यावा व वीज कापू नये, अशी मागणी केली. उर्जामंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. तुमसर -मोहाडी तालुक्यातील वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्याचे प्रयत्न करण्याचे ठोस आश्वासन दिले.

Web Title: Rural pipelines and agricultural pumps should not be cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.