जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:00 AM2018-12-19T01:00:55+5:302018-12-19T01:01:57+5:30

आधुनिक संचार माध्यमाच्या काळातही आपले अस्तित्व टिकवून असलेल्या पोस्ट खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी देशव्यापी संप मंगळवारपासून पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील ४०० वर पोस्टमन, पोस्टमास्तर सहभागी झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील डाकसेवा ठप्प झाली आहे.

Rural Postal Service jam in the district | जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवा ठप्प

जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवा ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देदेशव्यापी संप : जिल्ह्यातील ४०० वर पोस्टमन, पोस्टमास्तर सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आधुनिक संचार माध्यमाच्या काळातही आपले अस्तित्व टिकवून असलेल्या पोस्ट खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी देशव्यापी संप मंगळवारपासून पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील ४०० वर पोस्टमन, पोस्टमास्तर सहभागी झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील डाकसेवा ठप्प झाली आहे. दरम्यान मंगळवारी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी कँडल मार्च काढून शक्तीप्रदर्शन केले.
आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना आणि नॅशनल युनीयन आॅफ ग्रामीण डाकसेवक संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात भंडारा जिल्ह्यातील डाकसेवक सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात सुमारे १२३ पोस्ट आॅफीस आहेत. तेथील ४०० वर कर्मचारी या संपात सहभागी झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील मनीआॅर्डर सेवा, रजिस्ट्री पत्र, आरडी, वीज बिल भरणा, सुकन्या योजनेचे काम आजपासून ठप्प झाले आहेत.
दरम्यान भंडारा जिल्ह्यातील कर्मचाºयांनी सोमवारी सायंकाळी येथील मुख्य डाक घरासमोरून कँडल मार्च काढला. यामध्ये अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनात संघटनेचे सचिव आर.एस. लिल्हारे, महाराष्ट्राचे सर्कल असीस्टंट सेक्रेटरी जनार्दन कावळे, राजेंद्र ठवकर, प्रभाकर उरकुडकर, किशोर येटरे, एम.एम. बागडे, टी.जी. कापगते, ए.के. वनस्कर, व्ही.एस. शेंडे, आर.जी. वंजारी, उकंडराव बारई, जे.पी. रंगारी, एम.टी. राऊत, आर.डी. ठाकरे, एस.यु. तिरपुडे, वाय.के. तिडके, व्ही.ई. भोयर, एस.एन. कोरे, एस.सी. मदनकर, एम.आर. भुसारी, व्ही.एच. वैरागडे, डी.पी. हटवार, एस.एन. जावळे, व्ही.एम. बडोले, सी.जी. लांबट सहभागी झाले होते. या आंदोलनाला आयटकचे हिवराज उके यांनी भेट देऊन समर्थन दिले आहे.
या आहेत मागण्या
ग्रामीण डाकसेवकांना १ जानेवारीपासून सेवानिवृत्तीचे फायदे द्यावे, दीड लाखांऐवजी पाच लाख रुपये ग्रॅज्युएटी द्यावी, ३० दिवसांची पगारी रजा मंजूर करावी, शैक्षणिक भत्ता द्यावा, कमलेश चंद्रा कमिटीच्या शिफारसी मान्य कराव्या, सिंगल हँड ब्रँचेस अपग्रेड कराव्या, ग्रामीण डाकसेवक कर्मचाºयांना आठ तासांचे काम देवून सिव्हील सर्व्हंड डिजीएस कर्मचारी करण्यात यावे, या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

Web Title: Rural Postal Service jam in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.