ग्रामीण पाणीपुरवठा योजना गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:34 AM2017-12-09T00:34:04+5:302017-12-09T00:34:23+5:30

Rural water supply scheme rolled out | ग्रामीण पाणीपुरवठा योजना गुंडाळली

ग्रामीण पाणीपुरवठा योजना गुंडाळली

Next

सिलेगाव येथील प्रकार : गावात खाऱ्या पाण्याचे स्त्रोत, येरली प्रादेशिक योजनेला गाव संलग्नित
रंजीत चिंचखेडे ।
आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : शासन आणि प्रशासनाचे उदासिनतेमुळे सिलेगावात असणारी ग्रामीण पाणीपुरवठा योजना गुंडाळण्यात आली आहे. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी येरली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला संलग्नीत करण्यात आले असले तरी, गावकरी विरोध करीत आहे. गावात स्वतंत्र नळ योजना मंजुर करण्याची मागणी आहे.
पंचायत समिती क्षेत्र असणाऱ्या सिलेगावात पिण्याचे पाण्याचे संकट आहे. या गावात खाऱ्या पाण्याचे स्त्रात आहेत. गावात उपलब्ध होणारे पाणी घरगुती उपयोगात आणले जात नाही. या पाण्याला जनावरे ही नापसंती दाखवित आहेत. गाव शेजारी शेत शिवारातील असणाऱ्या विहिरीचे पाणी आणले जात आहे. २ किमी अंतर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गाठावे लागत आहे. गावात साधे पिण्याचे पाणी प्राप्त होत नसल्याने गावकरी त्रस्त झाली आहेत. यामुळे गावात पंधरा वर्षापुर्वी ग्रामीण नळ योजना मंजुर करण्यात आली आहे.
वैनगंगा नदी काठावरील वांगी गावाचे शेजारी योजनेला पंपगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. या योजनेने काही वर्ष गावकऱ्यांची तहान भागविली आहे. या नळ योजनेवर ग्राम पंचायतचे नियंत्रण होते. पंरतु तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाने या नळ योजनेत असणाºया तांत्रिक समस्या निकाली काढण्याकडे दुर्लक्ष केले. गावकऱ्यांना गोड पाणी उपलब्ध करणारी ग्रामीण पाणीपुरवठा योजना भंगारात गेली. तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाचे निष्क्रियतेमुळे गावकºयांवर नविन सकंट निर्माण झाले आहे. गावकºयांचे हक्काचे योजना प्रशासनाने दुर्लक्षापणामुळे गुडाळण्यात आली असता, योजना पुर्नजीवीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाही. गावात ग्रामीण पाणीपुरवठा योजना बंद होताच गोड पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती सुरु झाली. हे गंभीर संकट असल्याचे कारणावरुन लोकप्रतिनिधीनी येरली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला गाव संलग्नीत करण्यासाठी प्रयत्न केले आहे.
गावात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची अभिनव टाकीला पाईप जोडण्यात आली आहे. जुनेच गावात योजनेचे नळ आहे. यामुळे गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी उपाय शोधण्यात आला असला तरी गावाला संलग्नीत केल्याने अन्याय करण्यात आलेला आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला गाव जोडण्यात आल्याने गावात स्वतंत्र नळ योजना मंजुर करतांना अडचणी निर्माण झाली आहे.

येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला संलग्नीत असणाऱ्या गावात पाण्याचे तात्पुरते स्त्रोत निर्माण करण्यात येत आहेत. योजना बंद असल्यास गावकºयांना पाण्ी मिळणार असून योजनेकरिता ४ लाखांचा निधी खेचून आणला आहे.
- प्रतिक्षा कटरे, जि.प. सदस्य चुल्हाड
सिलेगाव येथील बंद असणाºया नळ योजनेला सुरु करण्यासाठी ग्राम पंचायतला प्रस्ताव आलेला आहे. नाल्या लगत असणारी जागा निश्चित करण्यात आली असून ३२ लाख रुपये खर्चाचा अंदाजपत्रक मंजुरी करिता पाठविण्यात आला आहे.
- डी. बी. बावनकर, उपविभागीय अभियंता पाणीपुरवठा विभाग पं.स. तुमसर

Web Title: Rural water supply scheme rolled out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.