साकोलीत गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:18 PM2019-01-08T22:18:09+5:302019-01-08T22:18:29+5:30
काही वर्षांपूर्वी केवळ महानगरातच होणारी गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आता तालुका पातळीवरही होत असल्याचे दिसत आहे. साकोली येथील एका रुग्णालयात गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. एवढेच नाही तर अत्यल्प खर्चात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : काही वर्षांपूर्वी केवळ महानगरातच होणारी गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आता तालुका पातळीवरही होत असल्याचे दिसत आहे. साकोली येथील एका रुग्णालयात गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. एवढेच नाही तर अत्यल्प खर्चात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
साकोली हा तालुका राज्याच्या अगदी शेवटच्या टोकावर. या ठिकाणी आरोग्य सुविधांबाबत कायम बोंबाबोंब असते. मात्र येथील डॉक्टर भरत अग्रवाल यांनी या भागातील रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केला. अपघातग्रस्तांवर वेळेवर उपचार होऊ लागले. त्यामुळे मृत्यूची संख्या कमालीची घट झाली. अशातच आता त्यांनी आपल्या रुग्णालयात गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. वयाची ५५ वर्ष पूर्ण झालेल्या महिलेचे दोन्ही गुडघे निकामी झाले होते. दैनंदिन काम करणे अडचणीचे होते. महानगरात जाऊन गुडघा प्रत्यारोपण करणे त्या महिलेच्या आवाक्याबाहेर होते. तिने हा प्रकार डॉ.अग्रवाल यांना सांगितला. त्यांनी साकोलीतच गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
कधीकाळी महानगरात होणारी ही शस्त्रक्रिया डॉ.अग्रवाल यांनी साकोली सारख्या तालुक्याच्या ठिकाणी करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा दिला. या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण महिलेलाच दिलासा नव्हे तर संपूर्ण तालुक्याला यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.