पवनी तालुक्यात राजीव गांधी जयंतीदिनी सद्भावना रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:37 AM2021-08-22T04:37:58+5:302021-08-22T04:37:58+5:30
रॅलीची सुरुवात गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. ...
रॅलीची सुरुवात गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. प्रकाश देशकर, जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, विकास राऊत, जिल्हा महासचिव विजय रायपूरकर, धर्मेंद्र नंदरधने, तालुकाध्यक्ष शंकरराव तेलमासरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांचे यांच्या नेतृत्वाखाली सद्भावना रॅली पवनीनगरातील गांधी भवन, गांधी चौक, शिवाजी महाराज चौक, नेताजी चौक, तुकडोजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चंद्रशेखर आझाद चौकातून तालुक्यातील कोदुर्ली, धानोरी, भोजापूर, खातखेडा, सावरला, शेळी/सोमनाळा, ढोरप, कान्हाळगाव, सिरसाळा, निष्टी, भुयार, मेंढेगाव, निलज, वाही, निमगाव, सिंदपुरी, भेंडाळा, वलनी, मांगली, आसगाव (चौ.), ब्रह्मी, भावड, पिंपळगाव, कातुर्ली, केसलवाडा, चिखली, अड्याळ, कोंढा / कोसरा, आकोट, चिचाळ, पाथरी, गोसे(बु) येथून राजीव गांधी स्मारक, गोसेखुर्द येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीचा समारोप जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांचे अध्यक्षतेखाली सभा घेऊन करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपाध्यक्ष विकास राऊत, महासचिव धनंजय तिरपुडे, गंगाधरराव जिभकाटे, प्रकाश पचारे, शालू टेकाम, मनोहर उरकूडकर, धर्मेंद्र नंदरधने, देवेंद्र हजारे, कमलाकर रायपूरकर, पांडुरंग निशाणे, अनिकेत गभने, अमित पारधी, महेश नान्हे, नीलेश सावरबांधे, रोहित मोहरी, रामचंद्र मेश्राम, भगवान नवघरे, तुळशीदास बिलवने व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शंकरराव तेलमासरे यांनी प्रास्ताविक केले. अशोक पारधी यांनी संचालन, तर प्रकाश पचारे यांनी आभार मानले.
कोट
गोसेखुर्द येथील इंदिरासागर प्रकल्पाचे प्रणेते राजीव गांधी यांचे हस्ते सन १९८८ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. प्रकल्पामुळे भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यांतील शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली. राजीव गांधी यांच्या कार्याची भावी पिढीला आठवण राहावी, यासाठी गोसेखुर्द येथे राजीव गांधी स्मारकाचे निर्माण करण्यात आले आहे.
- मोहन पंचभाई, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, भंडारा.