सदाेष शवदाहिनीचा नातेवाईकांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:39 AM2021-09-21T04:39:28+5:302021-09-21T04:39:28+5:30
माेहाडी तालुक्यातील वरठी येथे स्मशानभूमीत अग्निसंस्कारासाठी शवदाहिनी तयार करण्यात आली. दीड वर्षापासून श्रेयाच्या वादात अडकलेली शवदाहिनी एकदाची स्मशानभूमीत काेणताही ...
माेहाडी तालुक्यातील वरठी येथे स्मशानभूमीत अग्निसंस्कारासाठी शवदाहिनी तयार करण्यात आली. दीड वर्षापासून श्रेयाच्या वादात अडकलेली शवदाहिनी एकदाची स्मशानभूमीत काेणताही गाजावाजा न करता लावण्यात आली. यासाठी सनफ्लॅग कंपनीने सीएसआर निधीतून पैसे दिले हाेते. दीड वर्षापूर्वी तयार करण्यात आलेली शवदाहिनी तांत्रिकदृष्ट्या चुकीची असल्याचे आता दिसून येत आहे. मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यासाठी त्याचा उपयाेग हाेताना दिसत नाही. शववाहिनीचे कठडे वाजवीपेक्षा जास्त उंच आहे. सरण रचताना अडचणीचे जाते. अनेकदा तर मृतदेह पूर्णत: जळत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करावे लागतात. या प्रकाराला कंटाळून नागरिक उघड्यावरच अंत्यसंस्कार करीत आहेत. ओट्यांवर शवदाहिनीनेच संपूर्ण जागा व्यापल्याने तेथे जागा नाही. पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावर अंत्यसंस्कार करणे भाग पडत आहे.
बाॅक्स
श्रेयासाठी पुढाकार, दुरुस्तीसाठी गायब
शवदाहिनी तयार करण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले असे म्हणत अनेक पुढाऱ्यांनी श्रेय लाटले. आता नागरिकांना मनस्ताप हाेत असताना दुरुस्तीसाठी कुणीही पुढाकार घेत नाही. शवदाहिनीवर खर्च केला कुणी आणि श्रेय काेण घेताे अशी स्थिती आहे. तांत्रिक दाेष असल्याने नागरिक संतापल्याचे पाहून श्रेय घेणारे पुढारी मात्र गायब झाले आहे.