तुमसरमध्ये सादिक व इरफान पोहचवतो घरपोच भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:00 AM2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:29+5:30

मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने कुणी घराबाहेर पडत नाही. ...

Sadiq and Irrfan deliver home vegetable to Tumsar | तुमसरमध्ये सादिक व इरफान पोहचवतो घरपोच भाजीपाला

तुमसरमध्ये सादिक व इरफान पोहचवतो घरपोच भाजीपाला

googlenewsNext
ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : कोरोनाच्या सावटात ऑटोरिक्षातून पोहचतात घरोघरी

मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने कुणी घराबाहेर पडत नाही. अशा काळात सामाजिक बांधिलकी जोपासत तुमसर येथील दोन भावंडांनी आॅटोरिक्षातून घरपोच भाजीपाला पोहचविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सामाजिक अंतर राखत हे दोन भावंडांचे फिरते भाजीपाला दुकान लॉकडाऊनच्या काळात दिलासा देत आहे.
साधिक शेर अली आणि इरफान शेर अली अशी या भावंडांची नावे आहेत. स्टेशनटोली परिसरात राहणाऱ्या या भावंडांचा कांदे बटाटे विक्रीचा व्यवसाय आहे. वडिलांसोबत आठवडी बाजारात दुकान लावतात. परंतु २२ मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली. नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले. सर्वसामान्य नागरिक व व्यवसायीकांना फटका बसत आहे. घराबाहेर पडले तर पोलिसांचा प्रसाद मिळण्याची भीती आहे.
महिला तर घराबाहेरच येत नाही. अशा स्थितीत भाजीपाला मिळणे कठीण झाले. हीच अडचण ओळखून इरफान आणि साधिक या भावंडानी घरपोच भाजीपाला पोहचविणे सुरू केले. भाजी विक्री करताना नागरिकांना तोंडाला मास्क लावण्याचा संदेश देवून एक मिटर अंतर ठेवण्यास सांगतात. साबनाने हात धुवून भाजी विक्री करतात.

अशी सुचली आयडिया
साधिक व इरफान या भावंडांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. परंतु तो ठप्प झाला. आपण घरपोच भाजीपाला पोहचविला तर आपलाही चरितार्थ चालेल, असे त्यांनी वडील शेरअली यांना सांगितले. त्यांनी परवानगी देतात आॅटोरिक्षाच्या माध्यमातून तुमसर शहर परिसरात आणि ग्रामीण भागात भाजी विकत आहे.

Web Title: Sadiq and Irrfan deliver home vegetable to Tumsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.