महामार्गावर प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

By Admin | Published: December 20, 2014 10:34 PM2014-12-20T22:34:34+5:302014-12-20T22:34:34+5:30

राष्ट्रीय महामार्गसह, राज्य महामार्ग व सर्व रस्त्यावर प्रवाशांना जीवघेणा अनुभव येत आहे. विविध मार्गावर लोखंडी सळाख, मोठी अवजारांची वाहतूक वाढली आहे. या वाहतुकीमुळे सातत्याने

Safety of the passengers on the highway | महामार्गावर प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

महामार्गावर प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

googlenewsNext

भंडारा : राष्ट्रीय महामार्गसह, राज्य महामार्ग व सर्व रस्त्यावर प्रवाशांना जीवघेणा अनुभव येत आहे. विविध मार्गावर लोखंडी सळाख, मोठी अवजारांची वाहतूक वाढली आहे. या वाहतुकीमुळे सातत्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. माल वाहतूक करणारी वाहने नेमकी कुणाची, कोणाची वाहतूक ती कोठून कोठे चालली याची पर्वा कुणालाच नाही. पोलिसांच्या, वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर दिवसाढवळ्या अशी जीवघेणी वाहतूक होत आहे.
या वाहनांमध्ये लोखंडी सळ्या, लोखंडी पाईप, घर बांधकामाची पत्रे, या साहित्याची असुरक्षित वाहतूक केली जाते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशी सुरक्षित घरी येईल की नाही याचीच चिंता परिवाराला लागली राहते.
व्यावसायिकांसह चालकांनी घ्यावी दक्षता
लोखंडी पत्रे, सळ्यासह ईतर वस्तू शहरातील कित्येक दुकानात भरुन घेतल्या जातात. अशा वस्तू भरत असताना संबंधित व्यावसायिकांनीच दक्षता घेणे नियमानुसार महत्वाचे आहे. यासाठी चालकांना सूचना देण्याची गरज आहे.
वाहनातून असे साहित्य नेताना चालकांनाही ती आवश्यक सूचना व दक्षता घेतल्यानंतर घडणारा दुर्देवी प्रसंग आणि त्याला सामोरे जाताना करावी लागणारी कसरत या दोन्ही बाबीपासून सर्वांचाच बचाव होणार आहे.
चालकावर कारवाई
लोखंडी गज, सळ्या पत्र्यासह इतर वस्तूंची वाहतूक सर्रास केली जाते. पाठीमागील वाहनाने हॉर्न दिले तरी साईड दिल्या जात नाही, अश्या चालकांना विचारण्याचा प्रयत्न केला तर अरेरावी केली जाते. एकूणच सर्र्वसामान्यांच्या जिवावर उठलेली वाहतूक थांबविण्याची गरज आहे.
वाहतूक पोलिसांची कमतरता
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने माल वाहतूक करणाऱ्या वाहतुकीची वर्दळ असतो. यामुळे वाहतुकीची कोंडी होते व लहान मोठे अपघात होतात. या अपघातात अनेकांना बळी द्यावे लागले आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा किंवा वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्याचे दिसून येत नाही.
धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांद्वारे कारवाई करण्यात येत नाही. केवळ एन्ट्री घेऊन प्रकरण निपटवले जाते. धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांद्वारे का कारवाई केली जात नाही हा नागरिकांचा सवाल आहे? अवैध वाहतूक, नियमबाह्य व धोकादायक वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची स्वतंत्र शाखा निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Safety of the passengers on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.