साहेब सांगा, धान पीकाला जगवायचे कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:12 PM2018-08-10T22:12:01+5:302018-08-10T22:12:17+5:30

Saheb, how to live in rice pakara? | साहेब सांगा, धान पीकाला जगवायचे कसे ?

साहेब सांगा, धान पीकाला जगवायचे कसे ?

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची आर्त हाक : किसान सभेने दिले तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : धानाची रोपे लावली. काही रोपे पाण्याअभावी तशीच उभी आहेत. रोवणी न झालेली रोपे अन् रोवणी झालेल्या पिकांना पाण्याशिवाय वाचवायचे कसे. हा सवाल प्रत्येक शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे. विहिरीत पाणी आहे, वीज आहे तर विद्युत कनेक्शन नाही अशा दोन्ही खिंडीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे ‘साहेब, तुम्हीच सांगा धान पिकांना वाचवायचे कसे’, ही आर्त हाक तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत जाण्यासाठी भंडारा जिल्हा किसान सभेतर्फे निवेदन देण्यात आले.
मोहाडी तालुक्यातील सातशेच्या वर विहिरीवर विद्युत जोडणीसाठी मागणीपत्र भरले आहेत. दोन वर्षानंतरही एकाही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात आलेला नाही. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व विद्युत जोडणी करणारे कंत्राटदार यांच्या कमिशनच्या वांध्यात शेतकऱ्यांना वेठीस पकडण्यात आले आहे मागील दोन वर्षापासून वीज जोडणी अभावी शेतकऱ्यांचे एका पाण्यासाठी धानाचे पीक हातातून गेले आहे.
याही वर्षी केवळ वीज जोडणी मिळणार या आशेवर महावितरण कंपनी ठेवत आहे. पावसाने दडी मारली आहे. तीन आठवडे झालीत पाऊस नाही. सुरनदीसह अनेक बंधारे कोरडे पडली आहेत. धानपिक वाचविण्यासाठी आतापासून डिझेल इंजीनच्याद्वारे शेतीला पाणी दिले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी ४० रूपये भरून मागणीपत्र भरले आहे. किमान त्या शेतकºयांना तात्पुरता वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी किसान सभेने केली आहे. वीज कनेक्शन दिले जात नाही, तात्पूरती वीज जोडणीसाठी कुणी ऐकत नाही, अशावेळी शेतकरी वीज चोरी करून पीकांना पाणी देतो.
पर्याय नसल्याने वर्षभराच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या हिंमतीने धोका पत्करून वीज चोरतो. त्या शेतकºयांना पकडण्याचा व दंड वसूल करण्याचा सपाटा वीज अधिकारी करीत आहेत. याविषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. ६ आॅगस्ट रोजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ८ आॅगस्टपासून १२ तास दिवसा व रात्री सहा तास शेती सिंचनासाठी वीज पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र उर्जामंत्र्यांच्या आश्वासनाची पूर्तता करायला उशिर झाला.
तीन दिवस उलटूनही शेतीला कुठेच १८ तास वीज दिली जात नाही. शेतकरी वाटाण्याच्या अक्षता देणाºया उर्जामंत्र्यांना गंभीर परिस्थिती भोगावे लागती, असे किसान सभेचे जिल्हा सचिव माधव बांते यांनी म्हटले आहे. मागणी पत्र भरलेल्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज कनेक्शन मिळेपर्यंत तात्पुरती वीज जोडणीची तातडीने सोय करून द्यावी. तसेच उर्जामंत्र्याच्या आश्वासनानुसार शेतीसाठी १८ तास वीज देण्यात यावी अन्यथा किसान सभा आंदोलन उभारेल, असे निवेदन तहसिलदार मोहाडी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. निवेदन देतानी किसान सभेचे सचिव माधवराव बांते, नितीन मोहारे, जयप्रकाश मसर्के, सुखचंद सुखदेवे, शंकर शेंडे, बिसन सार्वे, अयुब शेख, अनिल गाढवे, सलीम शेख, तुकाराम बांते आदी शेतकरी व किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतमजूर युनियनचे निवेदन
सातबारा कोरा करून शेतीला पर्याप्त बिनव्याज कर्जदेण्यात यावा, स्वामीनाथन अयोगाची अंमलबजावणी करा, शेती उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा भाव द्यावा. शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर, असंघटीत कामगार यांना वयाच्या ६० वर्षानंतर सेवानिवृत्तीवेतन द्या, श्रावण बाळसह इतर योजनेची पेन्शन एक हजार करा, दावेदारांना वनाधिकार कायद्याखाली जमिनीचे पट्टे द्या, सरकारी स्वस्त दुकानात साखर, केरोसीन उपलब्ध करा, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा आदी मागण्यांचेही निवेदन किसान सभा व लाल बावटा शेतमजूर युनियन मोहाडीतर्फे देण्यात आला.

Web Title: Saheb, how to live in rice pakara?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.