साहेब, दारुचे दुकान तत्काळ हटवा हो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:34 PM2017-09-10T23:34:53+5:302017-09-10T23:35:17+5:30

Saheb, the liquor shop should be removed immediately! | साहेब, दारुचे दुकान तत्काळ हटवा हो !

साहेब, दारुचे दुकान तत्काळ हटवा हो !

Next
ठळक मुद्देशेकडो महिलांचे जिल्हाधिकाºयांना साकडे : डोंगरगाव येथील प्रकरण , कायदा हाती घेण्याचा इशाराही

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : डोंगरगाव येथील भरवस्तीत असलेले देशी दारु दुकान हटविण्यासाठी डोंगरगाव येथील १३१ महिलांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन विनंती केली आहे. अन्यथा आम्ही स्वत: कायदा हातात घेऊन ते देशी दारु दुकान हटवू असा इशाराही दिला आहे. त्यामुळे प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे डोंगरगाववासीयांचे लक्ष लागून आहे.
नजीकच्या डोंगरगाव येथे भरवस्तीत एका चौकात देशी दारु दुकान आहे. दुकान फार जुनी आहे. मात्र आता या दारु दुकानात पूर्वीपेक्षा गर्दी जास्त होत असल्याने येथे दररोज सायंकाळी दारुड्यांची जत्राच भरत असते. तसेच जवळच दुर्गामातेचे मंदिर आणि श्री संत कमलदास बाबा यांचे मठ आहे. या दोन्ही ठिकाणी सकाळी व सायंकाळी आरतीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक विशेषत: महिला भाविक जात असतात. मात्र या दुकानाजवळ असलेल्या दारुड्यांपासून महिला, किशोरवयीन मुली व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सदर दुकान रस्त्यावर असल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. शेतावरून येणाºया महिलांच्या डोक्यावर काही ना काही ओझे असते. परंतु येथून जाताना येताना महिलांना नीट चालता सुद्धा येता येत नाही. महिलांना या दारूड्यांपासून मनस्ताप सहन करावा लागतो. दारुड्यांची हाणामारीही नित्याचीच बाब झालेली आहे. दारु दुकान गावाबाहेर नेण्यात यावे, अन्यथा १५ नोव्हेंबर नंतर डोंगरगाव येथील महिला या देशी दारु दुकानाची तोडफोड करून देशी दारु दुकाना मालकाला गावाबाहेर काढू यात जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर प्रशासनच जबाबदार राहील. असा इशाराही जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रातून दिला आहे. यात कांता चाचिरे, चंद्रकला चाचिरे, वनिता गभणे, राधा समरीत, शांतकला सेलोकर, माया चाचिरे, सुषमा सेलोकर, अनिता मेहर, गीता मेहर, दीक्षा नागपुरे,शारदा मेश्राम,सागर चाचिरे, लक्ष्मी चाचिरे, संगीता मानकर, गीता गभणे, प्रिती समरीत, नलू कोडकर, माधुरी मांढरे, पुष्पा गभणे, मिनाक्षी ढोमणे, उज्ज्वला हाडगे, नैना कुंभलकर, रंजना कुंभलकर इत्यादी १३१ महिलांनी स्वाक्षरी करून दिला आहे.

तीन महिन्यांपासून संघर्ष सुरु
डोंगरगाव येथे भरवस्तीत असलेले देशी दारु दुकान अन्यत्र हलविण्यात यावे यासाठी २३ जून २०१७ ला जिल्हा उत्पादन शुल्क विभागाला पत्र देण्यात आले होते. तेव्हापासून हे दुकान हटविण्यासाठी येथील महिला संघर्ष करीत आहेत. त्या आशयाच्या बातम्याही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र प्रशासनाने यावर कोणताही तोडगा काढलेला नसल्याने आता येथील महिलांनी हे दारु दुकान हटविण्याचा निर्णय घेतला आहे. वाट आहे ती १५ सप्टेंबरपर्यंतची.

Web Title: Saheb, the liquor shop should be removed immediately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.