संत गाडगेबाबा व वासुदेवांनी दिला स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 09:41 PM2019-01-28T21:41:42+5:302019-01-28T21:41:57+5:30

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमांतर्गत उपलब्ध स्वच्छता सुविधांचा नियमित वापर व्हावा, नियमित स्वच्छता राखावी व प्रत्येक ग्रामीण कुटूंबांनी शाश्वत स्वच्छता सवयींचा अंगीकार करावा या करिता पोलिस कवायत मैदानावरील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी काढण्यात आलेल्या चित्ररथाद्वारे शाश्वत स्वच्छतेचा जागर करण्यात आला.

Saint Gadgebaba and Vasudeva gave message of cleanliness | संत गाडगेबाबा व वासुदेवांनी दिला स्वच्छतेचा संदेश

संत गाडगेबाबा व वासुदेवांनी दिला स्वच्छतेचा संदेश

Next
ठळक मुद्देएक पाऊल स्वच्छतेकडे : पथसंचलनातून निरीक्षण, जनजागृतीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमांतर्गत उपलब्ध स्वच्छता सुविधांचा नियमित वापर व्हावा, नियमित स्वच्छता राखावी व प्रत्येक ग्रामीण कुटूंबांनी शाश्वत स्वच्छता सवयींचा अंगीकार करावा या करिता पोलिस कवायत मैदानावरील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी काढण्यात आलेल्या चित्ररथाद्वारे शाश्वत स्वच्छतेचा जागर करण्यात आला. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद भंडारा व वारकरी साहित्य परिषद जिल्हा भंडारा यांचे सहभागाने २६ जानेवारीला शाश्वत स्वच्छतेचा जागर चित्ररथाद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली.
सर्वप्रथम जिल्हा परिषद मध्ये पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांचे हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. भंडारा जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कैलास वाघाये महाराज, प्रवचनकार सचिन बुरले, विठ्ठल डिब्बे , तिर्थराम शिवरकर उपस्थित होते. ‘आली या स्वच्छतेची वारी, स्वच्छ करू या गाव सारे’ या राष्ट्रसंतांच्या भजनाद्वारे अधिकारी, कर्मचारी यांना शाश्वत स्वच्छतेसाठी आवाहन केले. याप्रसंगी प्रवचकार सृजन महाराज कारेमोरे यांनी संत गाडगेबाबा व विक्रम महाराज बाळबुध्दे यांनी वासुदेवाची भूमिका साकारून संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या कार्याला सर्वदूर पोहचविण्याचा संदेश दिला.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बागडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजूषा ठवकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) ज्ञानेश्वर सपाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी, शाश्वत स्वच्छतेचा संदेश देणा-या शाश्वत स्वच्छतेचा जागर या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविली.
त्यानंतर सदर चित्ररथ हे पोलिस मुख्यालयावरील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाकडे रवाना करण्यात आले. जिल्हा परिषद पासून तर पोलीस मुख्यालयावरील कवायत मैदानापर्यंत प्रवचनकारांच्या वाणीतून स्वच्छतेचा जागर करीत शाश्वत स्वच्छतेचा जागर चित्ररथ काढण्यात आला. पोलिस मुख्यालयावरील मुख्य ध्वजारोहरणानंतर परेड संचलनानंतर विविध विभागांसह स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमांतर्गत चित्ररथातून ‘शाश्वत स्वच्छतेचा जागर’ करण्यात आला.
चित्ररथ व स्वच्छता झांकीत जिल्ह्यातील प्रवचनकार व जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार सहभागी झाले होते. चित्ररथाचे प्रारंभी वेशभूषा परिधान केलेले संत गाडगेबाबा यांनी एका हातात खराटा व एका स्वच्छतेचा संदेश घेतला होता तर वासुदेवाच्या भूमिकेतून संपूर्ण स्वच्छता झाँकीत नाचत नाचत गावात हातात स्वच्छता संदेश फलक घेवून प्रवचनकार व तज्ज्ञ सल्लागार स्वच्छता चित्ररथात सहभागी झाले होते. या. प्रसंगी पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अधिकारी, कर्मचारी विद्यार्थ्यांनी चित्ररथाची पाहणी केली.

Web Title: Saint Gadgebaba and Vasudeva gave message of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.