साकोली पंचायत समितीचे वाहन भंगारावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 09:41 PM2018-11-28T21:41:31+5:302018-11-28T21:41:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : पंचायत समिती साकोलीच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांसाठी असलेली शासकीय वाहन सध्या कचऱ्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : पंचायत समिती साकोलीच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांसाठी असलेली शासकीय वाहन सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ठेवली आहे. मागील आठवड्यात या वाहनाला कचऱ्यासोबत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुदैवाने हा प्रसंग टळला असला तरी हे वाहन तिथेच पडले आहे. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.
पूर्वी पोलीस स्टेशनसमोर असलेल्या जुन्या पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातच सर्व विभाग होती.
मात्र महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात या पंचायत समितीच्या विभागाचे इतरत्र विभागणी करण्यात आली. यावेळी महिला व बालविकास प्रकल्प कार्यालय हे एम बी पटेल महाविद्यालयजवळ भाड्याच्या घरात आणण्यात आले. या विभागासाठी स्वतंत्र एक गाडी देण्यात आली.
दिवसेंदिवस ही गाडी खराब होत आली. तीला वारंवार दुरुस्त करण्यात आले मात्र कालांतराने ही जीप दुरुस्तीच्याही पलीकडे गेली. त्यामुळे ही जीप कार्यालयासमोर ठेवण्यात आली होती. मात्र काही वर्षानंतर या जीपला तिथुन ढकलून समोरच्या कचऱ्यात नेऊन फेकण्यात आली. तेव्हापासून ही कार कचºयाच्या ढिगाºयातच फेकली आहे.
मागील आठवड्यात कचऱ्याबरोबर या जीपला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुदैवाने हा प्रसंग टळला. तरीही ही जीप त्याच ठिकाणी आहे. जुन्या पंचायत समिती आवारात एवढी जागा असतांनी हे वाहन तीथे न ठेवता बेवारस स्थीतीत हे वाहन कसे काय ठेवण्यात आले. हा संशोधनाचा विषय आहे. एकीकडे शासन पैसे वाचविण्यासाठी विविध उपाय शोधते तर दुसरीकडे शासकीय अधिकारी पैशाची अशी उधळपट्टी करतांना दिसतात.