सखींनी अनुभवली ‘माझं माहेर, माझं कलर्स’ची धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:12 PM2018-04-30T23:12:58+5:302018-04-30T23:13:17+5:30

विविध स्पर्धा आणि मनोरंजनाची धमाल घेऊन येणाऱ्या ‘माझं माहेर, माझं कलर्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सखींनी आनंद आणि उत्साहाचे विविध रंग अनुभवले. सखींना प्रफुल्लित करणारा हा कार्यक्रम कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंचतर्फे शनिवार (दि.२८) आयोजित करण्यात आला होता. मंगलम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Sakhi has experienced 'my maher, my colors' | सखींनी अनुभवली ‘माझं माहेर, माझं कलर्स’ची धमाल

सखींनी अनुभवली ‘माझं माहेर, माझं कलर्स’ची धमाल

googlenewsNext
ठळक मुद्देस्पर्धांची रंगत : कलर्स आणि लोकमत सखी मंचचा कलरफु ल नजराणा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विविध स्पर्धा आणि मनोरंजनाची धमाल घेऊन येणाऱ्या ‘माझं माहेर, माझं कलर्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सखींनी आनंद आणि उत्साहाचे विविध रंग अनुभवले. सखींना प्रफुल्लित करणारा हा कार्यक्रम कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंचतर्फे शनिवार (दि.२८) आयोजित करण्यात आला होता. मंगलम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘कलर्स चॅनल’ आणि ‘लोकमत सखी मंच’ मनोरंजनाच्या अनेक रंगांमध्ये आपल्या रसिकांना रंगवून टाकतात. त्याचप्रमाणे ‘माझं माहेर, माझं कलर्स’ हा कार्यक्रम म्हणजे सखींच्या उत्साहाचा उत्सव सोहळाच होता. ‘रंगुनी रंगात साºया, रंग माझा वेगळा’ या ओळींप्रमाणे मनोरंजनाचा एक वेगळा रंग कलर्स चॅनलतर्फे ‘लोकमत सखी मंच’च्या माध्यमातून आपल्या पे्रक्षकांसाठी आणण्यात आला होता.
यामध्ये रेसिपी, नृत्य, मेहंदी, रांगोळी, उखाणे व रस्सीखेच अशा स्पर्धा घेण्यात आल्या. सखींच्या उत्साहपूर्ण प्रतिसादामुळे प्रत्येक स्पर्धेची रंगत अधिकच वाढली. रेसिपी स्पर्धेमध्ये आपल्या पाककलेचे कौशल्य दाखवत सखींनी मँगो पनीर पॅकेट, मँगो केक, मँगो हलवा, मँगो मोदक, मँगो चॉकलेट, मँगो भेल, मँगो बरफी, मँगो लाडू यासारखे नावीन्यपूर्ण पदार्थ बनवून आणले होते. नृत्य स्पर्धेत सखींच्या बहारदार नृत्याने उपस्थितांना ठेका धरायला लावला.
अत्यंत चुरशीच्या सामन्यात रस्सीखेच स्पर्धेत स्पर्धकच नाही तर दर्शकांनीही एकच जल्लोष केला. संस्कार भारती ते बेटी बचाव या सामाजिक संदेश देणारे कलाकृती रांगोळी स्पर्धेत रेखाटण्यात आले. लग्न समारंभाच्या या महिन्यात मेहंदी स्पर्धेने सर्व सखींचे लक्ष वेधले तर उखाणे स्पर्धेत एका मिनिटात उखाण्याचा वर्षाव होत होता असे भासत होते.
कलर्स चॅनलच्या कार्यक्रमातून आपल्याला दिसतात रोमान्स, ड्रामा, कॉमेडी, बदला यासारख्या विविध भावभावनांचे रंग. लंडन येथे दीपसोबत ‘इश्क में मरजावा’ मालिकेत आरोही घेणार आपल्या अपमानाचा बदला. यात दिसणार अपमानाचा रंग, तर ‘तू आशिकी’मध्ये आहानचे पंक्तीवर असलेले जिवापाड प्रेम आणि त्या प्रेमापोटी जे.डी.पासून वाचविण्याचा त्याचा अटोकाट प्रयत्न, हा एक वेगळाच रंग बघावयास मिळतो. ‘बेपनाह’मध्ये झोयाला कळणार आहे, आपल्या नवºयाच्या प्रेमाचे रहस्य. तिच्या विश्वासाला तडा जाणार असून, विश्वासघाताचा हा रंग आणखी किती वेगळे वळण घेणार हे येणाºया काळातच समजेल. ‘माझं माहेर, माझं कलर्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन व स्पर्धांचे विविध रंग अनुभवायला मिळाल्याची आनंददायी प्रतिक्रिया सखींनी नोंदविली.

कलर्स स्पर्धांमधील विजेते
कलर्सतर्फे प्रेक्षकांसाठी घेतल्या गेलेल्या स्पर्धांमध्ये संध्या रामटेके प्रथम, मंगला क्षीरसागर द्वितीय तर प्रिती मुळेवार यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
विविध स्पर्धांमधील विजेते
रेसिपी स्पर्धा : प्रथम - दिपाली भालेराव, द्वितीय - किरण भावसार, तृतीय - चित्रा झुरमुरे.
नृत्य स्पर्धा : प्रथम - तृप्ती शेंडे, द्वितीय - लिना खेडकर, तृतीय - सपना सोनार.
मेहंदी स्पर्धा : प्रथम - पूजा थोटे, द्वितीय - श्रद्धा डोंगरे.
रांगोळी स्पर्धा : प्रथम - दिप्ती भोले, द्वितीय - मनिषा बिजवे, तृतीय - पूजा धोटे
उखाणे स्पर्धा : प्रथम - प्रतिभा मेश्राम, द्वितीय - शालिनी घमे, तृतीय - स्वाती सेलोकर.
रस्सीखेच स्पर्धा : प्रथम संघ - संध्या रामटेके, अर्चना अंबादे, उषा गावंडे, मंगला क्षीरसागर, सीमा कोचे, उषा घरडे, श्रद्धा डोंगरे, यामिनी बांडेबुचे, जयश्री तोडकर.
विक्रम फडके यांनी नृत्य, वंदना दंडारे मेहंदी स्पर्धा, कल्पना शेट्टी यांनी रांगोळी तर व्यंजन स्पर्धेचे परीक्षण मंगला डहाके व यामिनी बांडेबुचे यांनी केले.

Web Title: Sakhi has experienced 'my maher, my colors'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.