साकोली पशू रुग्णवाहिका बनली शोभेची वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:39 AM2021-09-21T04:39:08+5:302021-09-21T04:39:08+5:30

महाराष्ट्र शासनाने शेतकरी व पशुपालक यांच्या पाळीव जनावरांवर योग्यवेळी व अचूक उपचार व्हावेत हा उदात्त हेतू समोर ठेवून राज्यातील ...

Sakoli animal ambulance became an ornament | साकोली पशू रुग्णवाहिका बनली शोभेची वस्तू

साकोली पशू रुग्णवाहिका बनली शोभेची वस्तू

Next

महाराष्ट्र शासनाने शेतकरी व पशुपालक यांच्या पाळीव जनावरांवर योग्यवेळी व अचूक उपचार व्हावेत हा उदात्त हेतू समोर ठेवून राज्यातील प्रत्येक तालुक्यात शासनाने पशू रुग्णवाहिका दिलेल्या आहेत परंतु साकोली तालुक्याला मिळालेली रुग्णवाहिका मागील कित्येक महिन्यापासून सहायक आयुक्त पशुसंवर्धन विभाग नागझिरा रोड, साकोली येथे उभी असून पशू रुग्णवाहिका ज्या ठिकाणी उभी आहे, त्या रुग्णवाहिकेच्या आजूबाजूला गवत सुद्धा उगवलेला आहे. त्यामुळे ही पशू रुग्णवाहिका तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व पशुपालकांच्या पाळीव प्राण्यांच्या उपचारासाठी शासनाने दिलेल्या पशू रुग्णवाहिका फक्त कागदावरच उपयोगात आणली जात आहे.

शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही पशू रुग्णवाहिका सध्या शोभेची वस्तू बनली असल्यामुळे या मार्गाने जाणारे येणारे पशुपालक व शेतकरी यांच्या कोणत्याही उपयोगाची नाही अशी पशुपालकात चर्चा आहे. या रुग्णवाहिकेची रोज एका गावाची निवड करून ज्या ठिकाणी पशू दवाखाना नाही अशा गावात ही रुग्णवाहिका न्यावी व त्या परिसरातील पाळीव प्राण्यांवर उपचार करावा अशी मागणी केली आहे.

Web Title: Sakoli animal ambulance became an ornament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.