साकोलीत धनुर्विज्ञा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:32 PM2017-09-28T23:32:37+5:302017-09-28T23:32:56+5:30
क्रीडा व युवकसेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय भंडारा व भंडारा जिल्हा अॅम्यूचेअर आर्चरी असोसिएशनच्या वतीने स्थानीय तालुका क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय धनुर्विज्ञा
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : क्रीडा व युवकसेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय भंडारा व भंडारा जिल्हा अॅम्यूचेअर आर्चरी असोसिएशनच्या वतीने स्थानीय तालुका क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय धनुर्विज्ञा शालेय १४, १७, १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेचे उद्घाटन डॉ. नेपाल रंगारी जि.प. सदस्य क्रीडा मंडळ शाहिद कुरैशी, आर्चरीचे राष्ट्रीय खेळाडू संघटनेचे अध्यक्ष नईम कुरैशी सचिव रविकुमार रंगारी व क्रीडा अधिकारी भंडारा संदीप खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेत संपूर्ण भंडारा जिल्ह्यातून ५० खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात कृष्णमुरारी कटकवार विद्यालय साकोली, जि.प. हायस्कूल साकोली, कामाई करंजेकर विद्यालय एकोडी, सेंट पिटर स्कूल भंडारा, महिला समाज विद्यालय भंडारा, पोद्दार इंटरनॅशनल जेसीस कॉन्व्हेंट, वैनगंगा विद्यालय पवनी यांनी सहभाग घेतला. १४ वर्षे मुलांच्या संघात सोहन लाखडे, प्रज्वला चौधरी, अथर्व सारवे, हर्ष रंगारी, राधिका बडगे, नुपूर सेलोकर, कामाक्षी ईश्वरकर, मानसी द्रुगकर, १७ वर्षे मुलात प्रज्वल चुटे, अजिंक्य उरंडे, तेजस मानापुरे, रोहीत बिरणवार, मुलींमध्ये रविना रंगारी, नयन द्रुगकर, भूमिका बांगळे, प्रांजल नगरकर, १९ वर्षे मुले भूषण भुरे, मुलीमध्ये सेजल जनबंधू, मोनाक्षी ईश्वरकर, दिप्ती कठाणे, खुशबू हिंगे यांची निवड विभागीय स्पर्धेकरिता करण्यात आली. विजयी खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बीले, दिलीप इटणकर, अनिराम मरस्कोल्हे यांनी कौतुक केले.