साकोलीत नगरसेवक मुख्याधिकारी आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:29 AM2021-01-04T04:29:22+5:302021-01-04T04:29:22+5:30

साकोली : अतिक्रमण काढण्याच्या कारवाईवरून आक्षेप घेत संताप व्यक्त करत काही नगरसेवकांनी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्यावर ताशेेरे ओढले होते. ...

Sakoli corporator chief officer face to face | साकोलीत नगरसेवक मुख्याधिकारी आमने-सामने

साकोलीत नगरसेवक मुख्याधिकारी आमने-सामने

Next

साकोली : अतिक्रमण काढण्याच्या कारवाईवरून आक्षेप घेत संताप व्यक्त करत काही नगरसेवकांनी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्यावर ताशेेरे ओढले होते. या प्रकरणावरून नगरसेवकांविरुद्ध खोट्या आरोपांचे व चुकीचे दस्तऐवज तयार करून विविध विभागांकडे तक्रारी करण्यात आल्या, असे नगरसेवकांचे म्हणणे असून या अनुषंगाने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुख्याधिकारी मडावी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

१७ डिसेंबर २०२० ला राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील प्रेमशीला अरुण भैसारे हिचे हातठेल्यावर असलेले चहाचे दुकान व संतोष घरोटे यांचे हातठेल्यावरील दुकान नोटीस न देता व नियबाह्यरित्या हटविण्याची कारवाई मुख्याधिकाऱ्यांनी केली. कारवाईचा विरोध करत नागरिकांनी नगरपरिषदेसमोर एकत्र येत रोष व्यक्त केला.

नागरिकांची समजूत घालण्याच्या उद्देशाने नगरसेवक हेमंत भारद्वाज, भाजपा शहराध्यक्ष व माजी उपसरपंच किशोर पोगळे हे मोक्यावर गेले होते. यावेळी माधुरी मडावी यांनी काहीच कारण नसताना या दोघांनीही उद्धटपणे बोलून सर्वांसमोर अपमानित केले. दरम्यान, या अनुषंगाने नगराध्यक्ष माजी आमदार बाळा काशीवार, शिवकुमार गणवीर व इतर प्रतिष्ठित नागरिक नगरपरिषदेमध्ये एकत्रित चर्चा करत होते. त्या प्रभागाच्या नगरसेविका व गटनेता या नात्याने अनिता पोगळे यासुद्धा चर्चेच्या वेळी उपस्थित होत्या.

मुख्याधिकाऱ्यांची उलट तक्रार

याप्रमाणे वस्तुस्थिती असताना माधुरी मडावी यांनी १७ डिसेंबरला राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील कटकवार यांच्या दुकानासमोरील अतिक्रमण काढून स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सौंदर्यीकरणाचे काम करत असताना नगरसेवक हेमराज भारद्वाज नगरसेविका व गटनेता अनिता किशोर पोगळे तसेच त्यांचे पती किशोर पोगळे यांनी कामात अडथळा निर्माण केला. शिवीगाळ करून सौंदर्यीकरणाचे काम थांबविले, असा खोटा आरोप व बनावट आरोप करून तव त्यासंदर्भात खोट्या पुराव्यांनिशी दस्ताऐवज तयार करुन खोट्या तक्रारी केल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या सर्व प्रकारामुळे माधुरी मडावी यांच्यावर फौजदारी व शिस्तभंगाची कारवाई करण्याकरिता नगराध्यक्ष धनवंता राऊत, स्वीकृत नगरसेवक ॲड. दिलीप कातोरे, नगरसेवक हेमराजसिंग भारद्वाज, भोजेंद्र गहाणे, नगरसेविका वनिता डोये, अनिता पोगडे, लता कापगते यांनी लिखीत तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

विरोध केल्याने आकस

विशेष म्हणजे नगरसेवक हेमराजसिंग भारद्वाज व अनिता पोगळे यांनी नियमबाह्य व नागरिकांना त्रास होणाऱ्या कृतीचा विरोध केला. जुन्या बसस्टाॅपच्या ठिकाणी नियमबाह्यरित्या बांधकाम तोडून अधिकाराशिवाय रस्ता तयार करणे लाखांदूर रोडवरील शासनाने अधिग्रहीत केलेल्या जागेत नियमबाह्यरित्या बिरसा मुंडा मूर्ती स्थापनेच्या अनुषंगाने आक्षेप घेतला होता. याचा आकस घेऊन माधुरी मडावी यांनी विरोध करणाऱ्या नगरसेवकांना त्रास देणे सुरू केले आहे.

Web Title: Sakoli corporator chief officer face to face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.