साकोली-पवनीत अविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:09 PM2018-01-24T23:09:56+5:302018-01-24T23:10:53+5:30

येथील नगर परिषद सभापतीपदाची बुधवारला अविरोध निवड करण्यात आली. यात महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी राजश्री मुंगुलमारे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी जगन उईके तर स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी मीना लांजेवार यांची निवड करण्यात आली.

Sakoli-Pawneet Unconditional Selection | साकोली-पवनीत अविरोध निवड

साकोली-पवनीत अविरोध निवड

Next
ठळक मुद्देविषय समितीची निवडणूक : साकोलीत सभापतींना बसण्यासाठी कक्षच नाही

आॅनलाईन लोकमत
साकोली : येथील नगर परिषद सभापतीपदाची बुधवारला अविरोध निवड करण्यात आली. यात महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी राजश्री मुंगुलमारे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी जगन उईके तर स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी मीना लांजेवार यांची निवड करण्यात आली. नगरपरिषदेत सभापतीसाठी स्वतंत्र कक्ष नसल्याने सभापतीमध्ये नाराजीचा सूर आहे.
साकोली नगरपरिषदेत आज नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. या तिन्ही समितीच्या सभापतीची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अध्याशी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नगराध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष तरूण मल्लाणी, गटनेता अनिता पोगडे, शहर अध्यक्ष किशोर पोगडे उपस्थित होते.
पवनी : येथील नगर परिषदेच्या विषय समितीची निवडणूक उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नगराध्यक्ष पूनम काटेखाये यांची पदसिद्ध सभापती म्हणून स्थायी समितीवर निवड करण्यात आली. बांधकाम समितीच्या सभापतीपदी विजय बावनकर यांची शिक्षण समिती सभापतीपदावर प्रियंका जुमळे, पाणी पुरवठा व जल निस्सारण समिती सभापतीपदावर विजय उरकुडकर, महिला व बाल कल्याण सभापतीपदी रोशनी बावनकर तर स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपद उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर यांचेकडे सोपविण्यात आले. विलास काटेखाये यांच्या नेतृत्वात नगरविकास आघाडीने ही निवडणूक जिंकली होती. नगराध्यक्ष पद आघाडीकडे तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे कमलाकर रायपुरकर यांची वर्णी लागली होती. यावेळी मुख्याधिकारी माधुरी मडावी, नगराध्यक्ष पूनम काटेखाये, उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: Sakoli-Pawneet Unconditional Selection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.