साकोलीचे नवे मुख्याधिकारी रामटेके रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:43 AM2021-09-16T04:43:35+5:302021-09-16T04:43:35+5:30
साकोली : साकोली येथील रिक्त जागेवर नवे मुख्य अधिकारी म्हणून कुलभूषण रामटेके हे आज साकोली येथे रुजू झाले. तत्कालीन ...
साकोली : साकोली येथील रिक्त जागेवर नवे मुख्य अधिकारी म्हणून कुलभूषण रामटेके हे आज साकोली येथे रुजू झाले. तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचे स्थानांतरण यवतमाळ नगरपरिषदमध्ये झालेले आहे. तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी साकोली नगरपरिषदेमध्ये एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. या एक वर्षात त्यांनी कर्मचाऱ्यांना कामाची शिस्त प्रशासकीय काम गावात सुंदर सुंदर बगीचे साफसफाई करून नकळत योग्य काम केले. अशा विविध कामांनी त्यांनी साकोलीला एक वेगळी ओळख करून दिली. आपली एक वेगळी ओळख दाखवून गेली; मात्र त्यांच्या स्थानांतरण यानंतर त्यांच्या ठिकाणी नवे मुख्याधिकारी म्हणून रामटेक रुजू झाले आहेत. त्यांच्या कार्याची शैली काय ते कितपत काम करतात, लोकांना त्यांचे काम खरोखर आवडेल की नाही, ही येणारी वेळ सांगणार आहे.