एसटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून पगार लटकले, ऐन श्रावनात शिमगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:39 AM2021-08-19T04:39:14+5:302021-08-19T04:39:14+5:30
बॉक्स उत्पन्न कमी खर्च जास्त एसटी महामंडळाने सध्या सर्वच मार्गावरील बसेस सुरू केल्या असल्या तरीही डिझेलसह इतर खर्च वाढला ...
बॉक्स
उत्पन्न कमी खर्च जास्त
एसटी महामंडळाने सध्या सर्वच मार्गावरील बसेस सुरू केल्या असल्या तरीही डिझेलसह इतर खर्च वाढला आहे त्यामुळे महामंडळाला तुलनेने उत्पन्न कमी आणि खर्च जास्त येत असल्याने तोटा वाढत चालला आहे. राज्य शासनाने एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याची मागणी आता कर्मचाऱ्यांमधून जोर धरू लागली आहे. काेराेनानंतर एसटी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. सध्या भंडारा आगारातील बस दर दिवशी ९० हजार किमी चालतात. त्यासाठी सरासरी १८ हजार लिटर डिझेल लागते. डिझेलचे दर ९८ रुपये प्रति लिटर असून दरराेज महामंडळाला १७ लाख ६४ हजार रुपये डिझेलसाठी खर्च करावे लागत आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी अवस्था सध्या आहे.
उसनवार तरी किती करायची....
कोट
आम्हाला अनेकदा अकोला, नागपूर-वर्धा तसेच मालवाहू ट्रकची ड्युटी घेऊन दूरवर जावे लागते. अशावेळी चहा, नाश्ता, जेवणावर खर्च होतोच. त्यातच दोन महिणे पगार नसल्याने कुटुंबालाही अनेक अडचणी येत आहेत. शासनाने आम्हाला वेळेत किमान पगार तरी दिला पाहिजे.
एसटी चालक
कोट
मला सेवानिवृत्तीला काहीच वर्ष राहिली आहेत. मात्र इतक्या वर्षात कधीही पगाराची अडचण आली नाही. मात्र कोरोनानंतर एसटी महामंडळातसह कर्मचाऱ्यांनाही असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता मात्र शासनानेच लक्ष दिले पाहिजे.
एक वाहक
कोट
एसटी महामंडळातर्फे उत्पन्न वाढीसाठी सर्वतोपरी उपक्रम राबवले जात आहेत. प्रवाशांचा चांगला प्रतिसादही लाभत आहे. मात्र कोरोना काळात अनेक एसटी बसेस बंद असल्याने एसटी महामंडळाचा तोटा अजूनही भरून निघालेला नाही. यामुळेच कधी कधी वेतन होण्यास विलंब लागत आहे. डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा