मृत वनमजुराचे काढले वेतन

By admin | Published: May 26, 2016 01:40 AM2016-05-26T01:40:08+5:302016-05-26T01:40:08+5:30

तुमसर वनपरिक्षेत्राअंतर्गत काही वनकर्मचाऱ्यांचे दोनदा वेतन अदा करण्यात आले असून एका वनमजुराचा मृत्यू झाल्यानंतरही वेतन काढण्यात आले.

Salary removed from dead wages | मृत वनमजुराचे काढले वेतन

मृत वनमजुराचे काढले वेतन

Next

तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयाचा कारभार : कर्मचाऱ्यांच्या वेतनात नेहमीच फेरबदल
तुमसर : तुमसर वनपरिक्षेत्राअंतर्गत काही वनकर्मचाऱ्यांचे दोनदा वेतन अदा करण्यात आले असून एका वनमजुराचा मृत्यू झाल्यानंतरही वेतन काढण्यात आले. या कार्यालयांतर्गत १ लक्ष २१ हजार ५७७ रुपयांची शासकीय रकमेचा गैरवापर करण्यात आला. एप्रिल महिन्याचे वेतन रखडले आहे. या प्रकरणी चौकशी व निराकरण न झाल्यास २६ मे पाूसन लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा वनकर्मचारी संघटनेने दिला आहे.
उपवनसंरक्षक, भंडारा यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, तुमसर वनपरिक्षेत्रातील काही वनकर्मचाऱ्यांना माहे मे २०१४ चे दोनदा वेतन अदा करण्यात आले असून १,२१,५७७ रुपयांचा शासकीय रकमेत गैरवापर करण्यात आला आहे. तुमसर वनपरिक्षेत्रातील वनमजूर सुरेश अनंतराम शेंडे व शरद अनंतराम शेंडे स्थायी वनमजूर असून यांच्या वेतन बिलात नेहमी फेरबदल होत असते. लेखापाल यांच्या वेतन देयकात सुधारणा करीत नाही.
तुमसर वनपरिक्षेत्रातील मृत कर्मचारी सुखदेव यादो शरणागत स्थायी वनमजुर २६ फेब्रुवारी २०१६ ला मृत्युमुखी पडले, परंतु मार्च २०१६ मध्ये वेतन काढण्यात आले. शासनाने दर महिन्याला ५ तारखेला वेतन देण्याच्या सूचना केल्या आहेत, परंतु दर महिन्याला २० ते २५ तारखेला वेतन मिळते. माहे एप्रिलचे वेतन अजूनपर्यंत मिळाले नाही.
यापूर्वी वेतनासंबंधी समस्यांचे तथा इतर समस्यांचे निराकरण करण्याचे मौखिक आदेश तुमसर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना दिले होते. परंतु त्यांची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. वेतनवाढ आदेश, रजा मंजुरी, भनिनि प्रकरणे, सेवानिवृत्त वनकर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याचे थकबाकीची रक्कम तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम, वनरक्षक व वनपाल यांदा देण्यात येणारी विशेष प्रवास भत्ता रकमेची थकबाकी अद्यापही अदा करण्यात आली नाही.
काही शासकीय रकमा स्वत:च्या मनमर्जीप्रमाणे चुकीच्या स्वरुपात अदा करणे तथा रजा मंजूरी आदेश पारित होऊनसुध्दा कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात येत नाही. दर महिन्याला वेतन अदा केल्यावर कर्मचाऱ्यांना वेतन चिठ्ठी देणे आवश्यक असूनही वेतन चिठ्ठी देण्यात येत नाही. वेतनात मोठा फरक येत असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी लेखापाल अपशब्दात बोलतात.
या प्रकारामुळे वन कर्मचाऱ्यात असंतोष व्याप्त आहे. वन कर्मचाऱ्यांवर येथे आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. २६ मे पासून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता काम बंद आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे. येथील वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचे येथे नियंत्रण नसल्याचे दिसून येते. उपवनसंरक्षकांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेण्याची गरज आहे. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना कर्तव्यात कसून प्रकरणी कारवाईची गरज आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Salary removed from dead wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.