सालेबर्डीच्या पुनर्वसन प्रस्तावाला मंजुरी

By admin | Published: April 10, 2017 12:34 AM2017-04-10T00:34:07+5:302017-04-10T00:34:07+5:30

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात बाधीत असलेल्या सालेबर्डी पांधी या गावचे पुनर्वसनाचे प्रकरण गेल्या दीड वर्षापाूसन

Salbardi's rehabilitation proposal has been approved | सालेबर्डीच्या पुनर्वसन प्रस्तावाला मंजुरी

सालेबर्डीच्या पुनर्वसन प्रस्तावाला मंजुरी

Next

मार्ग मोकळा : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा प्रयत्नाला यश
जवाहरनगर : भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात बाधीत असलेल्या सालेबर्डी पांधी या गावचे पुनर्वसनाचे प्रकरण गेल्या दीड वर्षापाूसन महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तपत्रामध्ये नकारार्थी वृत्त प्रकाशित झाल्यामुळे गेल्या दिड वर्षापासून मंत्रालयात हे प्रकरण प्रलंबित होते. अखेर सदर गावच्या पुनर्वसन प्रस्तावाला व पुनर्वसन करण्यास शासनाची कोणतेही नाहरकत नसून मंत्री मंडळाची मंजूर देण्यात आली.
सालेबर्डी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पात संपादित करण्यात आले. सदर गावाला मोबदला व पॅकेज त्याचप्रमाणे शेतीचा मोबदला व पॅकेज देण्यात आले असे २३ कोटी या गावावर खर्च करण्यात आले व पुनर्वसनाची प्रक्रिया पुढे सुरु असताना काही कारणास्तव सदर गावाची पुर्नवसन प्रक्रिया थांबविण्यात आली.
त्यावर शासनाने चौकशी समिती नेमुन चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना अहवाल मागविण्यात आले व हे प्रकरण मंत्रालयात गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित होते. सदर गावाचे पुनर्वसन प्रकरण मंत्रालयात संथगतीने होते मात्र सालेबर्डीच्या गावच्या लोकप्रतिनिधी सरपंच, उपसरपंच व त्यांच्या सदस्यांनी मुंबई येथील मंत्रालयात क्षेत्राचे आमदार अवसरे यांच्या नेतृवात वेळोवेळी पुनर्वसन मंत्रालयात प्रलंबित असलेले प्रकरण मार्गी लावण्यात आले.
गावाच्या पुनर्वसन प्रस्थावाला मंत्रालयातून लवकरात लवकर मंजूरी मिळावी म्हणून नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा करण्यात आली होती. मंत्रीमंडळाच्या बैठकीत अखेर या गावाच्या पुनर्वसन प्रस्तावास व पुनर्वसन करण्यास हरकत नसल्याचे शिक्कामोर्तब झाल्यामुळे सदर गावाच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे सालेबर्डी वासीयांना भुखंड पट्टे त्यांना मिळणार यामुळे गावकऱ्यात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Salbardi's rehabilitation proposal has been approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.